Pankaja Munde Devendra Fadnavis Dhananjay munde .jpg Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News: 'काळा कोट घालून बीडची वकिली,बदनामीचं षडयंत्र, दुधात खडा...' ; देवाभाऊसमोरच पंकजा मुंडेंची सगळी खदखद बाहेर

Local Body Election News: बीड जिल्ह्याची बदनामी रोखण्यासाठी मी काळा कोट घालून मैदानात उतरले, बदनामीचे षडयंत्र आम्ही हाणून पाडले आणि एक विस्कटलेले चित्र पुन्हा सुंदर करण्याचे काम आम्ही केले आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं चांगले चित्र काढले, तर गुरू त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देतो, तशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमच्या पाठीवर असते, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Jagdish Pansare

Beed News : ज्या माझ्या बीड जिल्ह्याने गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारेख रत्न देशाला दिले. केशरकाकू क्षीरसागर, विमलताई मुंदडा, रजनीताई पाटील, प्रीतम मुंडे यांच्यासारख्या महिला खासदार निवडून देत महिलांचा सन्मान केला, तो बीड जिल्हा बदनाम करण्याचे षडयंत्र केले गेले. काही राजकीय परिस्थितीमुळे आम्हाला हा त्रास सहन करावा लागला. पण हे बदनामीचे षडयंत्र आम्ही हाणून पाडले, असा दावा भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला.

बीड जिल्ह्याची बदनामी रोखण्यासाठी मी काळा कोट घालून मैदानात उतरले, बदनामीचे षडयंत्र आम्ही हाणून पाडले आणि एक विस्कटलेले चित्र पुन्हा सुंदर करण्याचे काम आम्ही केले आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं चांगले चित्र काढले, तर गुरू त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देतो, तशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमच्या पाठीवर असते, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. शेवटचे काही तास शिल्लक असताना आज बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली.

पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भाषण करताना जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच तुमच्या येण्यामुळे आपल्या उमेदवारांना बळ, शक्ती मिळाल्याचे सांगितले. काही दिवसापूर्वी माझ्याकडे योगेश क्षीरसागर पत्नीसह माझ्याकडे आले. एक चांगला डाॅक्टर मुलगा विधानसभा लढला, पण थोडक्यात त्याचा पराभव झाला.

बीडमध्ये आपण नेहमी युतीचे राजकारण केले आहे. आम्ही कायम क्षीरसागरांच्या पाठीशी राहिलो. पण भाजपच्या (BJP) शत-प्रतिशत धोरणानुसार या दोघांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. आता नगरपरिषदेची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे.

आम्ही सुविद्य, सुशिक्षत, चांगले उमेदवार देताना राष्ट्रवादाला स्थान दिले, गुंडागर्दीला नाही. सुशिक्षित, स्वच्छ चेहरे आपण दिले. हा जिल्हा मुंडेसाहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. भाजप पक्षाची बीज त्यांनी इथं रोवली आहेत. राजकीय रणांगण म्हणून मी बीडकडे कधी पाहत नाही, मी याला वसा म्हणून जपते. तुम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच ओंजळ भरभरून दिलं. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्याला दिलेत, आता बिंदूसरा नदीचा पूर्ण विकास करण्याचा शब्द मी तुमच्या वतीने जिल्ह्याला दिला आहे.

बीड जिल्हा बदनाम करण्याचे षडयंत्र आम्ही हाणून पाडले आहे. काळा कोट घालून मी बीड जिल्ह्याची वकिली करत मैदानात उतरले आहे. माझ्या या जिल्ह्याकडे आतापर्यंत कोणी वाकडी मान करून पाहण्याची हिंमत केली नव्हती. पण मध्यंतरीच्या काळात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्हाला खूप काही सहन करावं लागलं.

महिलांचा सन्मान करणारा, सर्वाधिक महिला खासदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. बीडचे विस्कटलेले चित्र आम्ही सुंदरपणे रेखाटले आहे. बीडच्या बदललेल्या या चित्रामध्ये आता दुधात खडा टाकावा तसा प्रयत्न कोणी करू नये, याची काळजी आम्ही घेत आहोत, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT