Prithviraj Chavan Epstein Files : पृथ्वीराज चव्हाणांच्या सूचक पोस्टनं खळबळ! अमेरिकन संसदची 'एपस्टाईन फाईल्स', भारतीय राजकारणावर परिणाम?

Prithviraj Chavan Suggests Epstein Files in US Congress May Impact Indian Politics : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकन संसद एपस्टाईन फाइलची माहिती समोर आल्यावर भारतीय राजकारणावर परिणाम होणार असल्याचे संकेत दिले.
Prithviraj Chavan Epstein Files
Prithviraj Chavan Epstein FilesSarkarnama
Published on
Updated on

US Congress Epstein case India impact : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'एपस्टाईन फाइल्स ट्रान्सपरन्सी अ‍ॅक्ट'वर स्वाक्षरी केली आहे. यानंतर जेफ्री एपस्टाईनच्या लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित फाइल्स प्रसिद्ध होणार आहेत. एपस्टाईनवर अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप असून, त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे.

या फाईलींमध्ये असंख्य राजकारणी आणि अधिकाऱ्यांची नावे आहेत, ज्यामुळे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर बनत चाललं आहे. याचा धागा पकडून काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'एक्स'वर यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून, त्यामुळे खळबळ उडली आहे.

अमेरिकन संसद जेव्हा एपस्टाईन फाइल्सची माहिती जाहीर करेल तेव्हा त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होतील? अशी सूचक पोस्ट पृथ्वीराज चव्हाण यांनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ही पोस्ट शेअर करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस महाराष्ट्राला टॅग केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एपस्टाईन फाइल्सची माहिती जाहीर झाल्यास, त्याचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे ऐन नगरपालिका निवडणुकीत देखील महाराष्ट्रात एपस्टाईन फाइल्स नेमकं काय प्रकरण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

Prithviraj Chavan Epstein Files
Muslim Vote Promise BJP : मी अंबानी यांना पैसे मागेन, त्यांच्याशी माझे चांगले संबंध; मंत्री महाजनांनी मतांसाठी मुस्लिमांना चुचकारलं!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'एपस्टाईन फाइल्स ट्रान्सपरन्सी अॅक्ट'वर स्वाक्षरी केली आहे. यानंतर, कायदा मंत्रालयाला आता सर्व फायली, जेफ्री एपस्टाईनच्या लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित झालेला तपास आणि 2019मध्ये तुरुंगात झालेला त्याचा मृत्यू, या सर्वांची माहिती 30 दिवसांच्या आत जाहीर करावी लागणार आहे.

Prithviraj Chavan Epstein Files
Top 10 News : अजित पवार ते कुंभ मेळा आणि गिरीष महाजन ते साधुसंत तर विलासरावांचे सरकार वाचविणारा नेता कोण? यासह वाचा Top Ten राजकीय घडामोडी...

जेफ्री एपस्टाईन हा एक अमेरिकन फायनान्सर आणि गुंतवणूकदार होता, ज्याच्यावर लैंगिक तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण आणि संघटित गुन्हेगारीचा आरोप होता. तो श्रीमंत, राजकारणी, सेलिब्रिटी आणि शास्त्रज्ञांच्या वर्तुळात वावरायचा. 2019 मध्ये लैंगिक तस्करीचा खटला सुरू झाला असताना, त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. अधिकृतपणे ही आत्महत्या असल्याचे म्हटले गेले. परंतु त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

राजकारणी अन् अधिकाऱ्यांची नावे

हे प्रश्न एपस्टाईन फाइल्सच्या केंद्रस्थानी आहेत, ज्यामध्ये त्याचे नेटवर्क, कनेक्शन आणि गुन्ह्यांचे तपशीलवार न्यायालयीन कागदपत्रे आहेत. या फाईली आता चर्चेत आल्या आहेत. कारण यात अनेक राष्ट्रातील राजकारणी आणि अधिकाऱ्यांची नावे आली आहेत. या व्यक्ती एपस्टाईनच्या सामाजिक आणि व्यावसायिक वर्तुळाशी जोडल्या गेल्या होत्या. तथापि, बहुतेक प्रकरणांमध्ये, ही नावे केवळ उल्लेख आहेत, गुन्ह्यांचा थेट आरोप नाही.

एपस्टाईन फाईल्स काय आहे प्रकरण

एपस्टाईन फाईल्समध्ये प्रामुख्याने 2015मध्ये व्हर्जिनिया रॉबर्ट्स गिफ्रे (पीडित) यांनी घिसलेन मॅक्सवेल (एपस्टाईनची जोडीदार आणि सह-आरोपी) विरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रांचा संदर्भ आहे.

'एपस्टाईन'च्या नेटवर्कची गंभीर रहस्य

2021 मध्ये मॅक्सवेलला लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. जानेवारी 2024मध्ये सीलबंद करण्यात आलेल्या या कागदपत्रांमध्ये फ्लाइट लॉग, जप्ती, ई-मेल आणि सूचना समाविष्ट आहेत. एकूण, जवळपास 200 नावे नमूद केली आहेत. परंतु ही "क्लायंट यादी" नाही, तर एपस्टाईनच्या सामाजिक आणि आर्थिक नेटवर्कची गंभीर रहस्य असल्याचे म्हटले जात आहे.

2025मध्ये प्रकरण का चर्चेत आलं

- अमेरिकन काँग्रेसने एपस्टाईनच्या इस्टेटकडून नवीन ई-मेल आणि कागदपत्रांची विनंती केली आहे, ज्यात 20 हून अधिक बँकांमधील खात्यांचा उल्लेख आहे.

- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅटर्नी जनरल पाम बोंडी यांना बिल क्लिंटन आणि इतरांचे एपस्टाईनशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

- डेमोक्रॅटिक ओव्हरसाईट कमिटीने तिसरी बॅचची फाईल्स प्रसिद्ध केली, ज्यामध्ये एलोन मस्क, पीटर थिएल आणि स्टीव्ह बॅनन सारखी नावे देखील समाविष्ट होती.

- पीडितांनी स्वतः "क्लायंट लिस्ट" तयार करण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये एपस्टाईनच्या सहकाऱ्यांची नावे असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com