Pankaja Munde sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : 'वंचितांना त्रास दिलाय, हिशोब घेतल्या शिवाय शांत बसणार नाही', भगवान गडावरून पंकजा मुंडे कडाडल्या

Pankaja munde dasara melava : आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाकेंचा उल्लेख गोंडस लेकरु असा केला. त्या म्हणाल्या हाके यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला.

Roshan More

Pankaja Munde News : राज्यात दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. आज बीडमधील सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज भगवान भक्तिगडावर संपन्न झाला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकारणाची दिशा स्पष्ट करताना ज्यांची पत नाही, ऐपत नाही त्यांच्यासाठी मी राजकारणात आहे, असे सांगत नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, 'घोडा मैदान लांब नाही. धनुभाऊ यांना परळीत आम्ही निवडून आणणार. पण राज्याच्या कानाकोपऱ्यात आमच्या लोकांना , वंचितांना, पीडितांना, गरीबांना कोठेही त्रास दिला असेल तर आम्ही त्याचा हिशोब घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.

वंचितांसाठी गरीबांसाठी घेणाऱ्या प्रत्येक निर्णयासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण खर्ची घालीन. तुम्हाला वाटतय का? की ताई पडल्यामुळे नाराज झाल्यात. आमदारकी भेटल्यामुळे शांत झाल्यात, अस तुम्हाला वाटतं का? नाही ना. विश्वास आहे ना.', असा सवाल देखील मेळाव्याला उपस्थित जनसमुदायाला पंकजा मुंडे यांनी विचारला.

लक्ष्मण हाके मुंडेंच्या व्यासपीठावर

मनोज जरांगेंच्या विरोधात जाहीर भूमिका घेत उपोषण करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाकेंचा उल्लेख गोंडस लेकरु असा केला. त्या म्हणाल्या हाके यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही. पण लक्ष्मण हाके याठिकाणी आल्यानंतर त्यांनी भगवान बाबा आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीला वंदन केलं मी त्यांचं स्वागत करते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT