Amol Mitkari : अमोल मिटकरींनी केली रावणाची आरती; म्हणाले, “पुतळ्याचं दहन करणारे रामासारखे...”

Amol Mitkari On Ravana : अमोल मिटकरी यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सांगोळा येथे रावणाची महाआरती केली आहे. यावेळी आदिवासी समाज आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
amol mitkari.jpg
amol mitkari.jpgsarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) आमदार अमोल मिटकरी यांनी रावणाची आरती केली आहे. दसऱ्याच्या निमित्त एकीकडे रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. दुसरीकडे मिटकरी यांनी रावणाची आरती केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सांगोळा येथे रावणाची महाआरती केली आहे. यावेळी आदिवासी समाज आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल मिटकरी यांचा राष्ट्रवादी हा पक्ष भाजप आणि शिवसेनेसोबत ( शिंदे गट ) महायुतीत आहे. मिटकरी यांनी रावणाची आरती केल्यानं नव्या वाद निर्माण होऊ शकतो.

गेल्यावर्षी मिटकरी यांनी रावणाच्या मंदिराच्या जीर्णोद्घारासाठी 20 लाखांचा निधी दिला होता. यानंतर एकच गदारोळ उडालेल. आता पुन्हा सांगोळ्यात जात मिटकरी यांनी रावण दहनाच्या परंपरेवर देशात बंदी घालण्याची मागणी केली आहे.

amol mitkari.jpg
Manoj Jarange Patil : सुट्टी नाही! जरांगेंनी शिंदे सरकारला ‘डेडलाइन’ देत दिली ‘वॉर्निंग’

अमोल मिटकरी म्हणाले, “रावणाच्या पुतळ्याचं दहन करणारे प्रभू श्री रामासारखे पवित्र आहेत का? रावण हा ज्ञानी आणि सत्पुरूष होता. रावणातील चांगुलपणावर समाजानं दुर्लक्ष केलं. रावणाने सीते मातेचं एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करीत, तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता.”

amol mitkari.jpg
Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांनी नारायणगडावरून थोपटले दंड; म्हणाले, “न्याय मिळाला नाही, तर...”

“मी रावण मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानं मला राजकीय अडचण झाली. मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र, आता सामाजिक संघटनांच्या मदतीनं मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करू,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com