Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Dasara Melava : तुमची साथ अन् शक्ती...; दसरा मेळाव्यापूर्वी पंकजा मुंडेंचा दमदार टीझर

Beed Politics News : मी भगवान बाबा, मुंडे साहेबांसमोर व तुमच्या भक्ती व शक्तीच्या समोर नतमस्तक आहे.

Amol Jaybhaye

Pankaja Munde Beed Sabha : ''मी भगवान बाबा, मुंडे साहेबांसमोर व तुमच्या भक्ती व शक्तीच्या समोर नतमस्तक आहे. जीवनात कधीच कुठली गोष्ट कमी होण्याची भीती मला वाटली नाही. एकच वाटत होते धनसंपत्ती कमी झाली तर चालेल वेळप्रसंगी प्रतिष्ठा कमी झाली तरी चालेल पण ही जनसंपत्ती व लाभलेला वारसा तसूभरही कमी व्हायला नको. कितीही वादळ सोसण्यासाठी मी तयार आहे. तुमची साथ आणि तुमची शक्ती हीच माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. फक्त माझ्या डोक्यावर एवढा आशीर्वाद ठेवा,'' असे भावनिक आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने टीझरमधून केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीडच्या भगवान भक्तीगडावर मंगळवारी दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला त्यांचे हजारो समर्थक येणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे भगवान गडावरून पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी राज्यातून परिक्रमा यात्रा काढून राज्यभर भेटी दिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये (BJP) त्या नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, या केवळ अफवा असल्याचे सांगत त्यांनी नाराज असल्याच्या बातम्या खोट्या ठरविल्या होत्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आल्याने त्यांची राजकीय कोंडी झाली आहे.

परळी विधानसभेची जागा त्यांना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासाठी सोडावी लागणार आहे. तर दुसरीकडे जीएसटी थकबाकीवरून त्यांचा वैद्यनाथ साखर कारखान्याला नोटीस आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT