Drug Case : ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; बाळासाहेब थोरात आक्रमक

Balasaheb Thorat News : ड्रग्जच्या आहारी गेलेल्या एकट्या व्यक्तीचे नुकसान होत नाही तर संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama

प्रदीप पेंढारे

Nagar News : राज्यातील ड्रग्ज प्रकरणाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे राज्यातील तरुण वर्गाचे भवितव्य धोक्यात आले आहे. तरुणपिढीचे भवितव्य उद्‌ध्वस्त करणाऱ्या ड्रग्ज माफियांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. (Give death sentence to the accused in drug cases: Balasaheb Thorat's demand)

ड्रग्जच्या आहारी गेलेल्या एकट्या व्यक्तीचे नुकसान होत नाही तर संपूर्ण कुटुंबाची घडी विस्कटते. ते स्वतःबरोबरच कुटुंबाचेही नुकसान करत असतात. समाजातील वाईट घटनांना आळा घालण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते सरकार मात्र त्यावर काम करताना दिसत नाही. ड्रग्जच्या प्रकरणांकडे जेवढ्या गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला हवे, तेवढे लक्ष राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाकडून दिले जात नाही. हाच मोठा चिंतेचा विषय आहे, अशी चिंताही आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Balasaheb Thorat
Maratha Reservation : आरक्षणप्रकरणी मराठा समाज आक्रमक; अजितदादांना बारामतीत घेराव, माढ्यात दाखविले काळे झेंडे

थोरात म्हणाले की, मुळात तरुणपिढी या व्यसनांकडे कशी वळते, हे तपासण्याची गरज आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी का पकडण्यात आले नाहीत. या विषयावर सर्वांनी गंभीरपणे काम करण्याची गरज आहे. कारण, हा महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे. आतापर्यंतच्या प्रकरणांत दोष कोणाचा आहे. कोण चुकले आहे, याची चौकशी करून ड्रग्ज माफियांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच, या ड्रग्ज माफियांना मदत करणाऱ्यांनाही शिक्षा झाली पाहिजे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे एका मंत्र्यांबरेाबर छायाचित्र प्रसिद्ध झाली आहेत. त्यावर बोलताना थोरात यांनी ‘अशा गंभीर प्रकरणात लगेच कोणाला दोषी समजून त्यांच्या कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. राज्यात कोणाच्या जिवावर एवढे मोठे ड्रग्ज रॅकेट चालवले जात आहे, हेही पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा थोरातांनी व्यक्त केली.

Balasaheb Thorat
PMPML President Transfer : ‘पीएमपी’ला रुळावर आणणाऱ्या सिंह यांची अवघ्या चार महिन्यांत तडकाफडकी बदली

महाराष्ट्राचे भविष्य असलेल्या तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात कोण अडकवत आहे, याचा तपास लागला पाहिजे. ड्रग्ज प्रकरणात पाठबळ देणाऱ्यांना चिरडून टाकले पाहिजे. अशा प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवण्यात येऊ नये, असेही थोरातांनी म्हटले आहे.

Balasaheb Thorat
Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला आणखी किती बळी हवेत; संजय राऊतांचा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com