Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : पालकमंत्रिपदाच्या काळात टीका करणारे आज सोबत, ही देवाचीच किमया; पंकजा मुंडे कोणाबद्दल म्हणाल्या..!

An industry providing employment to ten thousand youth will be brought to the district : पंतप्रधानांकडे हट्ट धरून दहा हजार युवकांना रोजगार देणारा उद्योग जिल्ह्यात आणणार..

Dattatrya Deshmukh

Beed News : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत. ही निवडणूक कुठल्या कारणासाठी नाही. यातून मला काही मिळावं हेदेखील माझं स्वप्न नाही. तथापि, जिल्ह्यातील दहा हजार युवकांना रोजगार मिळेल, असा एखादा मोठा उद्योग पंतप्रधानांकडून हट्टाने जिल्ह्यात घेऊन यायचा आहे. कॅन्सर रुग्णांसाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचंय. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आपण काम करणार असल्याचे भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांनी सांगितले.

धारूर येथे आयोजित धनगर समाज बांधवांच्या मेळाव्यात पंकजा बोलत होत्या. माजी आमदार आर. टी. देशमुख, केशवद आंधळे, रमेश आडसकर, माजी नगराध्यक्ष डाॅ. स्वरूपसिंह हजारी, आयोजक माधव निर्मळ, उदयसिंह दिख्खत, राम कुलकर्णी, रामकृष्ण घुले, लक्ष्मण सिरसाट, कल्याण आबुज, बाळासाहेब चोले आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या आदर्श आहेत. आयुष्यात त्यांच्या वाट्याला खूप संघर्ष आला, पण सात्विकता न सोडता त्यांनी समाजाची सेवा केली. माझ्याही वाट्याला तसाच संघर्ष आला, शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करायची, पण सात्त्विकता ढळू द्यायची नाही हे मी राजकारणात ठरवलं आहे. मी निवडणुकीत उभी आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सोशल इंजिनिअरिंग दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे करायचे, तसाच प्रयत्न माझाही आहे.

पालकमंत्रिपदाच्या काळात खूप संघर्ष झाला, त्यावेळेस जे टीका करायचे आज ते सोबत आहेत ही देवाचीच किमया आहे. मी त्याकाळात राबविलेली प्रत्येक योजना गोरगरीब, सर्वसामान्य घटकांना न्याय देणारी होती. मुख्यमंत्री (CM) ग्राम सडक योजना वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत पोचवली. जलयुक्त शिवारचं मोठं काम केलं. अहिल्यादेवींच्या नावाने सामाजिक सभागृह बांधले. विकास करताना कुठलाही भेदभाव केला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

कुठलेच मुद्दे नसले की निवडणूक जातीवर जाते. आता आरक्षणाचा मुद्दा निर्माण झालाय. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, ते नक्की पूर्ण करतील. पण ही निवडणूक संसदेची आहे आणि तो विषय राज्याच्या सभागृहाचा आहे. मराठा समाजाला टिकणार आणि संविधानात बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या निवडणुकीत जिल्ह्याचा कसा विकास साधायचा यावर विचार केला गेला जावा. संसदेत गेल्यावर अदानी, अंबानी सर्व जण नावाने ओळखतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सांगितलं तर एखादा उद्योग बीडमध्येही येऊ शकतो, त्यात आपल्या जिल्ह्याचं कल्याणच होईल, यासाठी आपलं मतदान योग्य पारड्यात टाका, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी या वेळी केलं.

(Edited by : Chaitanya Machale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT