Pankaja Munde In Onkars Vaidyanath Sugar Factory News Parli Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : 'वैद्यनाथ कारखाना देताना मनाला वेदना झाल्या' ! ऊसाची मोळी टाकताना पंकजा मुंडे भावूक

Onkar-Vaidyanath Sugar Factory : गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर वाढती थकबाकी, कर्जाचा वाढत चाललेला डोंगर, कारखान्यातील साहित्याची चोरी, ईडीची नोटीस अशा संकटातून वाटचाल सुरू होती.

Jagdish Pansare

  1. वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या आणि म्हणाल्या, “कारखाना देताना मला वेदना झाल्या.”

  2. त्यांच्या भावनिक भाषणामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये वातावरण भारावून गेले.

  3. या वक्तव्यानंतर बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे कुटुंबावर चर्चा सुरू झाली आहे.

Beed Political News : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ओंकार ग्रुपने लिलावत खरेदी केला. या व्यवहारानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठली. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला कारखाना त्यांच्या मुलीने विकला या टीकेने पंकजा मुंडे व्यथित झाल्या होत्या. तर मी कारखाना विकला नाही तर तो वाचवला,असे सांगत पंकजा यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

आज याच कारखान्यात गळीत हंगामाचा शुभारंभ करताना पंकजा मुंडे यांनी ऊसाची मोळी टाकली. ती टाकत असताना त्या भावूक झाल्या होत्या. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सुरूवात केली होती. सुरूवातीला नफ्यात चाललेला हा कारखाना कालांतराने गोपीनाथ मुंडे यांनी जिल्ह्यातील इतर कारखाने चालवायला घेतल्यानंतर डबघाईला गेला.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर वाढती थकबाकी, कर्जाचा वाढत चाललेला डोंगर, कारखान्यातील साहित्याची चोरी, ईडीची नोटीस अशा संकटातून वाटचाल सुरू होती. अखेर थकीत कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित बँकेने कारखान्याचा लिलाव केला आणि त्यात ओंकार ग्रुपने तो खरेदी केला. ओकांर ग्रुपकडे सुत्रं गेल्यानंतर पहिल्या गळीत हंगामासाठीचे बाॅयलर आज पेटवण्यात आले. मंत्री पंकजा मुंडे यासाठी आवर्जून उपस्थित होत्या.

ऊसाची मोळी टाकताना त्या भावूक झाल्या होत्या. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. परळी कारखाना देताना मनाला खूप वेदना झाल्या, असेही पंकजा म्हणाल्या. आम्ही या ठिकाणी आल्यावर बाबा आम्हाला नेहमी काहीतरी सांगायचे. माझा मुलगा तेव्हा दीड वर्षांचा होता त्याला त्यांनी साखरेच्या पोत्यात ठेवले होते, अशी आठवण सांगताना त्या गहिवरल्या.

वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या असे त्यांनी सांगितले. दरम्यान, वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता कारखाना सुरू झाला असला तरी तो आता गोपीनाथ मुंडेंचा नाही, याबद्दल त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली नाराजी कायम आहे.

FAQs

1. पंकजा मुंडे भावूक का झाल्या?
→ वैद्यनाथ साखर कारखाना देताना झालेल्या भावनिक क्षणांबद्दल बोलताना त्या डोळ्यांत पाणी आले.

2. कार्यक्रम कुठे पार पडला?
→ बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगाम उद्घाटनाच्या कार्यक्रमात हा प्रसंग घडला.

3. त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?
→ “हा कारखाना देताना मनात वेदना झाल्या, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी तो निर्णय घ्यावा लागला,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

4. उपस्थितांची प्रतिक्रिया काय होती?
→ कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत पंकजा मुंडेंना पाठिंबा दिला, वातावरण भावनिक झालं.

5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
→ या भाषणामुळे मुंडे कुटुंबाच्या नेतृत्वावर आणि वैद्यनाथ कारखान्याच्या निर्णयावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT