Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde On BRS Offer: मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत पंकजा मुंडे प्रथमच बोलल्या; म्हणाल्या, ‘मी त्यावर...’

Maharashtra Politics: राजकीय पक्षांकडून आलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरबाबत पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

सरकारनामा ब्यूरो

Beed Political News: राज्यातील अनेक माजी आमदार, माजी खासदारांसह अनेक बड्या नेत्यांनी 'बीआरएस' पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या 'बीआरएस'ची मोठी चर्चा सुरू आहे. तर 'बीआरएस'कडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

'बीआरएस'कडून आलेल्या या ऑफरबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत भाष्य केलं नव्हतं. मात्र, आज त्यांनी या ऑफरबाबत भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मी अशा कोणत्याही ऑफरकडे अजून तरी सिरीयसली पाहिलं नाही", अशी सूचक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, "काही राजकीय पक्षांकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, याची माहिती मला माध्यमाच्या माध्यमातूनच समजली. पण या व्यतिरिक्त माझ्यापर्यंत काहीही पोहचलेलं नाही. त्यांना सर्वसमावेशक असा माझा चेहरा दिसत असावा, म्हणून माझ्याविषयी सर्वच पक्ष सकारात्मक बोलत आहेत. पण जे माझ्याविषयी सकारात्मक बोलत आहेत, त्यांच्याविषयी मी नकारात्मक बोलण्याचं काही कारण नाही. मात्र, या ऑफरकडे अजून तरी मी सिरीयसली पाहिलेलं नाही", अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचा आज जन्मदिन आहे. या निमित्ताने बीडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने फडणवीस आणि पंकजा मुंडे एका मंचावर येण्याची शक्यता आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT