मराठवाडा

Pankaja Munde News : मोठा अनर्थ टळला! पंकजा मुंडे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; नेमकं काय घडलं?

Pankaja Munde helicopter technical fault : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा अनर्थ टळला. नेमकं काय घडलं? सविस्तर वाचा.

Rashmi Mane

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रवासादरम्यान मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून त्या हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. मात्र उड्डाण सुरू होण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. खबरदारी म्हणून उड्डाण तत्काळ थांबवण्यात आले आणि त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

पंकजा मुंडे सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असून, त्यांचा आज लातूर दौरा नियोजित होता. प्रचारासाठी वेळेवर पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत होता. मात्र तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर सुरक्षेला प्राधान्य देत प्रवास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

कालच प्रचारादरम्यान 'मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते,' असे पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये झालेल्या प्रचार सभेत सांगितले होते आणि आज सकाळी त्यांचे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला.

या घटनेनंतर लातूरमध्ये नियोजित असलेल्या पंकजा मुंडे यांच्या काही सभांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला. हेलिकॉप्टरची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली असून, बिघाड नेमका कशामुळे झाला याचा अहवाल मागवण्यात येणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येत असून त्याद्वारे पंकजा मुंडे लातूरमधील प्रचार सभांना उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वेळेत बिघाड लक्षात आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, या घटनेमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT