TET Result : शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TET निकालाचा मुहूर्त ठरला; 'या' लिंकवर पाहा तुमचा निकाल!

Maharashtra TET final result update : TET परीक्षेचा अंतिम निकाल कधी लागणार याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. उमेदवारांमध्ये वाढली उत्सुकता आणि धाकधूक.
TET  exam
TET examsarkarnama
Published on
Updated on

शिक्षकांसाठी मोठी अपडेट! टीईटीचा अंतिम निकाल कधी जाहीर होणार, याकडे संपूर्ण राज्यातील उमेदवारांचे लक्ष लागले होते. आता या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार असून मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी टीईटीचा अंतिम निकाल जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंतरिम निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम निकालाबाबत असलेली धाकधूक आता वाढली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी ही शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सेवेत असलेल्या तसेच नव्याने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या टीईटी परीक्षेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वर्षीचा निकाल बघण्यासाठी https://mahatet.in/ या संकेतस्थळावर चेक करा.

TET  exam
Nashik NMC : गिरीश महाजनांनी एकाच शब्दात विषय संपवला, शिवसेना-राष्ट्रवादीला नाशिकमध्ये सत्तेत सहभाग देण्यास नकार

23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 4 लाख 75 हजार 668 उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यातील 1420 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. परीक्षा झाल्यानंतर उत्तरसूची जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारे अंतरिम निकाल पाहण्याची सुविधा देण्यात आली होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टीईटीचा निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परीक्षा परिषदेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा सुमारे दहा टक्क्यांपर्यंत निकालात वाढ होऊ शकते. त्यामुळे अनेक उमेदवारांमध्ये आशेचे वातावरण आहे.

TET  exam
Kolhapur Mayor 2026 : कोल्हापूरच्या महापौरपदी 'भाजपची' बाजी; सुरुवातीला सव्वा वर्षे 'रुपाराणी' यांना संधी; चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नोकरी टिकविणे, पदोन्नती मिळवणे यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे सेवेत असलेले अनेक शिक्षकही ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मंगळवारी निकाल जाहीर होताच आपण यशस्वी झालो की नाही, याचे उत्तर हजारो उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे टीईटीच्या अंतिम निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com