Manoj Jarange Patil-Pankaja Munde Dasara Melava News Sarkarnama
मराठवाडा

Dasara Melava : पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार का?

Manoj Jarange Patil-Pankaja Munde Dasara Melava : एकीकडे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे तर दुसरीकडे ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Jagdish Pansare

  1. मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे व मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

  2. शेतकऱ्यांचे प्रश्न, पूरग्रस्तांना मदत आणि आगामी निवडणुका यावर या दोन्ही नेत्यांची भूमिका चर्चेत राहणार आहे.

  3. मराठवाडा राजकारणातील पुढील दिशा या दसरा मेळाव्यातून निश्चित होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

Marathwada News : मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याचा दावा करणारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दुसरा दसरा मेळावा नारायण गडावर होणार आहे. तर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावरून सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे सावरगाव घाट येथील गोपीनाथ गडावरून पुढे चालवत आहेत. यंदा मराठवाड्यात पूर, अतिवृष्टी आणि ढगफुटीने थैमान घातले आहे.

अशावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि पंकजा मुंडे यांचा नियोजित दसरा मेळावा होणार का? झाला तर तो कशा पद्धतीने होणार? अशा चर्चा सध्या सुरू आहेत. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्याइतपत अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे. शेती, पिके, जनावरे, घरं, अन्नधान्य असं सगळंच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिक हताश आणि हातबल झाले आहेत.

तर आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करण्याची स्पर्धा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेते आणि लोकप्रतिनिधींमध्ये सुरू आहे. नुकसानीचे पंचनामे आणि मदतीचे आश्वासन यांचाही सध्या पूर आल्याचे चित्र आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तीन दिवसानंतर मराठवाड्यातील सावरगाव घाट आणि नारायणगड येथे होणाऱ्या दोन दसरा मेळाव्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. एक मेळावा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर दुसरा मेळावा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे घेणार आहेत.

सध्या हे दोघेही मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात पाहणी दौरे करत असून आपत्तीग्रस्त शेतकरी, नागरिकांना सरकारी मदत आणि दिलासा तातडीने कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यात मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. त्याच्या विरोधात ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आंदोलने केली. तर दुसरीकडे बंजारा, महादेव कोळी समाजानेही आदिवासींसाठी लागू असलेल्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत मोर्चे काढले.

एकीकडे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे तर दुसरीकडे ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आपला बीडमध्ये आयोजित ओबीसींचा मेळावा रद्द केला. पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही मोठा राजकीय कार्यक्रम होऊ नये यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. मात्र दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मनोज जरांगे पाटील आणि मंत्री पंकजा मुंडे सोडतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गडावरील हा दुसरा दसरा मेळावा आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय आणि त्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप हा ऐतिहासिक विजय मानला जातो. त्यामुळे हा विजय उत्सव नारायण गडावरील मेळाव्यातून साजरा करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रयत्न आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने हा मेळावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

तर दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांनीही गोपीनाथ गडावरील दसरा मेळावा साध्या पद्धतीने होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात आणि मराठवाड्यात पावसाचा असलेला धोका अजूनही टळलेला नाही. अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशावेळी मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

FAQs

Q1. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा का चर्चेत आहे?
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नांवर दोन्ही नेते काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Q2. या मेळाव्यात कोणते मुद्दे गाजण्याची शक्यता आहे?
शेतकऱ्यांचे प्रश्न, पूरग्रस्तांना मदत, आगामी निवडणुका आणि मराठवाडा राजकारणाचे समीकरण.

Q3. शेतकरी या मेळाव्याबद्दल काय अपेक्षा ठेवून आहेत?
शेतकरी पूरग्रस्तांसाठी ठोस मदत व हक्कांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.

Q4. दसरा मेळावा राजकारणावर काय परिणाम करू शकतो?
मराठवाड्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची आणि आगामी निवडणुकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

Q5. पूरस्थिती या मेळाव्यावर कसा प्रभाव टाकेल?
पूरामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला असल्याने हा मेळावा अधिक आक्रमक आणि भावनिक होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT