Pankaja Munde : आंदोलकांनी पंकजा मुंडे यांना घेरले; म्हणाल्या, माझे वडील धनगर समाजाच्या पाठीशी होते मी ही शेवटपर्यंत राहील!

Pankaja Munde Support Dhangar Community : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे कायम धनगर समाजाच्या पाठीशी होते तशा तुम्हीही आमच्या पाठीशी उभ्या राहा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
Pankaja Munde Support Dhangar Community News
Pankaja Munde Support Dhangar Community NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना घेरले.

  2. पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं की त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे धनगर समाजासोबत होते आणि त्या स्वतःही शेवटपर्यंत सोबत राहतील.

  3. आंदोलनामुळे महाराष्ट्रात पुन्हा आरक्षणाचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Dhangar Reservation News : हैदराबाद गॅझेट नुसार मराठा समाजातील नोंदी असलेल्या कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्या आधारे ओबीसीचे आरक्षण लागू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला त्यानंतर महादेव कोळी बंजारा आणि आता धनगर समाजाने आपल्यालाही एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. जालन्यातील अंबड चौफुली येथे नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवर दीपक बोराडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाच्या आठव्या दिवशी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आंदोलन स्थळी दाखल झाले. तर दुसरीकडे जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी धनगर आंदोलकांनी त्यांना घेराव घातला तसेच आंदोलन स्थळी भेट देण्याची मागणी केली. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे कायम धनगर समाजाच्या पाठीशी होते तशा तुम्हीही आमच्या पाठीशी उभ्या राहा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

यावर धनगर (Dhangar Reservation) समाज हा आपला समाज आहे माझे वडील या समाजाच्या पाठीशी होते आता मीही शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी आंदोलकांना दिली. घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना लवकरच आंदोलन स्थळी भेट देण्याचे आश्वासन देत पंकजा मुंडे आपल्या पाहणी दौऱ्यासाठी पुढे निघाल्या.

Pankaja Munde Support Dhangar Community News
Pankaja Munde : ओबीसी-मराठा संघर्षावर मंत्री पंकजा मुंडेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'मी जातीचा रंग पाहत नाही, राज्यकर्त्यांनी...'

तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनगर समाजाच्या मागण्यांना आपला पाठिंबा असून धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. दीपक बोराडे यांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. त्यांच्या भेटीसाठी अनेक नेते जालन्यात येत असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपण लवकरच दीपक बोराडे यांची भेट देऊ असे म्हटले आहे.

Pankaja Munde Support Dhangar Community News
Dhangar Reservation : धनगड दाखले रद्द, धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला?

दोन दिवसांपूर्वी एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी धनगर आरक्षण आंदोलन स्थळाला भेट देऊन दीपक बोराडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच धनगर समाज हा एसटी आरक्षणाला कसा पात्र ठरतो त्यासाठी काय नियम आहे, सुप्रीम कोर्टाच्या पाच खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी दिलेल्या निकालाचा दाखलाही सदावर्ते यांनी दिला होता. याचवेळी आंदोलक दीपक बोराडे यांनी आक्रमक भाषण करत माझा श्वास सुरू असेपर्यंत कायदा, पण ज्या दिवशी माझा श्वास थांबेल त्यानंतर मात्र कुणालाही सोडू नका असा इशारा दिला होता.

जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चा

धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी जालना शहरात इशारा मोर्चा काढण्यात आला. लाखोंच्या संख्येने धनगर समाज मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील गांधी चमन येथून या मोर्चाला सुरवात झाली. गांधी चमन, टाऊन हॉल, शनि मंदिर, उड्डाण पूल, नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुली येथे हा मोर्चा दाखल झाला. अंबड चौफुली येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

FAQs

प्र.१: पंकजा मुंडेंना कोणी घेरले?
उ.१: धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलकांनी पंकजा मुंडेंना घेरले.

प्र.२: त्यांनी आंदोलकांना काय उत्तर दिलं?
उ.२: त्या म्हणाल्या की माझे वडील धनगर समाजासोबत होते आणि मीही शेवटपर्यंत सोबत राहीन.

प्र.३: धनगर समाजाची मुख्य मागणी काय आहे?
उ.३: धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा ही त्यांची मुख्य मागणी आहे.

प्र.४: हा आंदोलन कुठे झाला?
उ.४: महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन पेटले असून पंकजा मुंडे यांच्या नुकसान पाहणी दौऱ्यात आंदोलकांनी घेराव घातला.

प्र.५: पंकजा मुंडेंच्या विधानाचा राजकीय परिणाम होईल का?
उ.५: होय, यामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com