Pankaja Munde Ramp Walk Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : रॅम्प वॉकवर टीका करणाऱ्यांना पंकजा मुंडेंचे सडेतोड उत्तर, ‘मला हौस नाही, पण....

Pankaja Munde Ramp Walk: फॅशन शोमधील रॅम्प वॉकवरून झालेल्या टीकेला पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले. जालन्यातील महिलांना व्यासपीठ आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन, असे त्या म्हणाल्या.

Jagdish Pansare

Maharashtra Politics news: राज्याच्या पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे यांनी मुंबईतील एका फॅशन शोमध्ये रॅम्प वाॅक केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकेवर पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले. 'मला रॅम्प वाॅकची हौस नाही, मी एका चोवीस वर्षाच्या मुलाची आई आहे. बावीस वर्षापासून राजकारणात सक्रीय आहे. माझ्या जालन्यातील महिलांना जर व्यासपीठ मिळणार असेल तर मी त्यांच्यासाठी पु्न्हा रॅम्प वाॅक करेल, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.

मराठवाड्यात दुष्काळ आहे, शेतकऱ्यांच्या पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, चाऱ्याअभावी जनावरे बाजारात विकण्याची वेळ आली आहे. दिवाळी दोन दिवसांवर आलेली असताना अजून सरकारी मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही. अशावेळी काल मुंबईत झालेल्या एका फॅशन शो मधील सहभागामुळे मंत्री पंकजा मुंडे या टीकेच्या धनी ठरल्या. असंवेदनशील असा हा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी केली.

या टीकेला मोजक्या शब्दात पकंजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्युत्तर दिले. "दोन विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी या रॅम्प वाॅकवर टीका केली. त्यावर मला फार काही बोलायचं नाही. मी ग्रामीण भागाच प्रतिनिधित्व करते.ग्रामीण महिलांना न्याय मिळावा, त्यांच्या कामाला ओळख मिळावी यासाठी त्या फॅशन शो मध्ये सहभागी झाले होते. तिथे माझ्या जालन्याच्या महिलांचा स्टाॅल लागतो ही फार मोठी गोष्ट आहे".

"जालन्यातील साडीला मोठे सेलिब्रेटी, माॅडल येऊन हात लावून पहात होते, ऑर्डर मिळते का? हे पाहत होते, ही मोठी गोष्ट होती. त्यासाठी मी तो रॅम्प वाॅक करत होते. मला काही हौस नव्हती. त्यामुळे टीका करणाऱ्यांना उत्तर देणे मी महत्त्वाचे समजत नाही. माझ्या महिलांसाठी पु्न्हा रॅम्प वाॅक करावा लागला, तर मी करेल", असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सतीश चव्हाणांसाठी आम्ही काम केले

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सतीश चव्हाण यांनी मित्रपक्षांवरही नाराजी व्यक्त केली. याकडे पंकजा मुंडे यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले. "यावर कोणी काही बोलले, त्याला मी उत्तर देणार नाही. परंतु सतीश चव्हाण यांच्या खात्यात जी मते पडली आहेत, त्यासाठी जे विश्वासदर्शक काम करावे लागले, ते आम्ही केले आहे. शिवाय त्यांनी कुठेही आमच्यावर टीका केली नाही, हे मला माहित आहे", असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. "जालन्याच्या सिल्कची ओळख जालनाई म्हणून आपण करत आहोत. या सिल्कपासून तयार केलेल्या साड्या, स्टोल व इतर वस्तून केवळ मुंबईतच नाही, तर देशभरात मार्केट उपलब्ध व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत", असेही त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT