Pankaja Munde  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News: 'ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता,तिथे 'ईव्हीएम'वर संशय नाही, की 'एसआयआर' बद्दल आक्षेप नाही? पंकजा मुंडेंनी विरोधकांना फटकारलं

Election Commission : निवडणूक आयोगाच्या तीनही अधिकार्‍यांनी आमच्यात कुठलेच मतभेद नाहीत हे स्पष्ट केले आहे. आम्ही संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी समोर आलो आहोत, अशा शब्दांत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या आरोपांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Jagdish Pansare

BJP News : 'एसआयआर'च्या मुद्यावरून काँग्रेस व विरोधी पक्ष हे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशातील सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांचा लोकशाहीवर असलेला विश्वास, संविधानावरील विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खोट्या गोष्टी पसरवत आहेत.

निवडणूक आयोगाच्या तीनही अधिकार्‍यांनी आमच्यात कुठलेच मतभेद नाहीत हे स्पष्ट केले आहे. आम्ही संविधान आणि लोकशाही बळकट करण्यासाठी समोर आलो आहोत, अशा शब्दांत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांच्या आरोपांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी एसआयआर ही प्रक्रिया मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणे, कोणीही चुकीची किंवा खोटी व्यक्ती मतदानास पात्र ठरू नये, आणि योग्य व्यक्ती अपात्र ठरू नये, यासाठी ही प्रक्रिया केली जाते.

२००४ मध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. त्यामुळे एसआयआरच्या प्रक्रियेवर शंका उपस्थित करणे व त्याबद्दल चुकीच्या माहितीआधारे, दिशाभूल करणारी विधाने काँग्रेस पक्ष आणि विरोधकांनी करू नये. माध्यमांनी व सोशल मिडियानेही शहानिशा करून जे सत्य आहे, तेच समाजासमोर आणावे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

काँग्रेस शासित राज्यात भूमिका काय?

देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. मग तेथील मतदान प्रक्रियेवर काँग्रेस व त्यांना साथ देणार्‍या विरोधी पक्षांची नेमकी भूमिका काय? तिथे ईव्हीएमवर संशय नाही, की मतदार याद्यांबद्दल आक्षेप नाही? हा दुटप्पीपणा योग्य आहे का? काँग्रेस व विरोधी पक्षांनी पराभव मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे.

लोकशाहीमध्ये जिंकलेल्या उमेदवाराचे यश आणि पराभूत झालेल्या व्यक्तीचा पराभव हा मान्य केला पाहिजे. तेवढा मनाचा मोठेपणा काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवायला हवा. पण ते न करता सातत्याने खोट्या गोष्टी पसरवून देशातील जनता, विद्यार्थी जेन झींचा लोकशाही आणि संविधानवरील विश्वास कसा उडेल? यासाठी विरोधक काम करत आहेत, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला. आम्ही राष्ट्र प्रथम मानणाऱ्या संघटनेत काम करतो. आमचा लोकशाही आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT