Suresh Dhas -Minister Pankaja Mundes News Sarkarnama
मराठवाडा

Beed News : बीड जिल्ह्यात भाजपला वातावरण पोषक, पण पंकजा मुंडे, सुरेश धस यांची अद्याप बैठकच नाही!

Pankajan Munde-Suresh Dhas Controversy : पंकजा मुंडे दोन दिवसांपासून जिल्ह्यात आहेत. धसांनी मात्र निवडणुक असलेल्या क्षेत्रात एन्ट्रीच केलेली नाही.

Jagdish Pansare

  1. बीड जिल्ह्यात भाजपला अनुकूल वातावरण असूनही पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील मतभेद कायम आहेत.

  2. दोघे एकत्र आल्यास पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो, परंतु स्थानिक स्तरावरील राजकीय स्पर्धा अडथळा ठरत आहे.

  3. आगामी निवडणुकीत हा दुरावा भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो, असा पक्षातील कार्यकर्त्यांचा दावा.

दत्ता देशमुख

Local Body Election 2025 : बीड जिल्ह्यात यश मिळवून शतप्रतिशत भाजपा आणण्यासाठी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्री पकंजा मुंडे यांना निवडणुक प्रभारी तर सुरेश धस यांच्यावर प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्यात पक्षाला पोषक वातावरण असताना अद्याप पंकजा मुंडे-सुरेश धस यांच्यात बैठक झालेली नाही. दोघांमधील वाद-मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. अशावेळी पक्षाने दोघांवर जबाबदारी टाकत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तो फारसा यशस्वी झाल्याचे अद्याप तरी दिसत नाहीये.

नगरपालिका, पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख नेते हे पक्षप्रवेश आणि उमेदवार ठरवण्यासाठीच्या बैठकांमध्ये व्यक्त आहे. जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र लढायचे की स्वबळावर याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. भाजपने ज्या पंकजा मुंडे, सुरेश धस यांच्यावर निवडणुक प्रभारी आणि प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे, ते सुद्धा अद्याप एकत्र बसलेले नाहीत. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीसे नाराजीचे वातावरण आहे.

नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी तशी सुरुच झाली म्हणायला हरकत नाही. नाही म्हणता आता भाजपलाही वातावरण पोषक होत आहे. मात्र, पक्षातील दोन प्रमुख नेते आणि पक्षाने निवडणुक प्रभारी व निवडणुक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविलेले मंत्री पंकजा मुंडे व आमदार सुरेश धस यांच्यात अद्याप तरी समन्वय बैठक वा नियोजनाच्या रणणिती आणि तयारीबाबत बैठक झालेली नाही. पंकजा मुंडे दोन दिवसांपासून जिल्ह्यात आहेत. धसांनी मात्र निवडणुक असलेल्या क्षेत्रात एन्ट्रीच केलेली नाही.

बीड जिल्ह्यातील बीड, परळी, माजलगाव, गेवराई, धारुर व अंबाजोगाई या सहा नगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत. बीड वगळता चार नगर पालिकांमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातच समोरा समोर लढत होणार आहे. तर, बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.

परळीत भाजप -राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर खल सुरुच आहे. दरम्यान, भाजपने अंबाजोगाईत नंदकिशोर मुंदडा, गेवराईत गीता पवार यांची नावे निश्चित केली आहेत. उर्वरित ठिकाणीही चाचपणी सुरु आहे. या दोन नगर पालिकांसह धारुर, माजलगावमध्येही पक्षाने चांगली मोट बांधली आहे. मुंडे यांनी परळीचा आढावा घेत बुधवारी बीडलाही चाचपणी केली.

मात्र, निवडणुकीच्या दृष्टीने रणनिती ठरविणे, उमेदवारांची यादी निश्चित करणे, रपचाराचे नियोजन याबाबत पक्षाने नेमलेल्या निवडणुक प्रभारी पंकजा मुंडे व निवडणुक प्रमुख सुरेश धस यांच्यात मात्र अद्यापही बैठक झालेली नाही. दिवस थोडे आणि सोंग फार अशा वळणावर निवडणुक होत असताना आणखीही एकमेकांचे विरोधक नेते निवडणुकीत जवळ कधी येणार याकडे भाजपजनांचे डोळे लागले आहेत.

FAQs

1. पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात वाद का आहे?
स्थानिक नेतृत्व व मतदारसंघातील राजकीय वर्चस्वासाठी दोघांमध्ये मतभेद असल्याचे सांगितले जाते.

2. बीड जिल्ह्यात भाजपचे सध्याचे वातावरण कसे आहे?
भाजपला बीडमध्ये मजबूत जनाधार आहे, परंतु नेत्यांमधील अंतर्गत मतभेद अडथळा ठरत आहेत.

3. मुंडे आणि धस एकत्र आले तर काय परिणाम होईल?
दोघे एकत्र आल्यास भाजपला प्रचंड राजकीय फायदा होऊ शकतो आणि विरोधकांचे समीकरण बिघडू शकते.

4. आगामी निवडणुकीत याचा परिणाम काय दिसेल?
एकत्र न आल्यास पक्षातील मतविभाजनामुळे विरोधकांना फायदा होऊ शकतो.

5. पक्ष नेतृत्वाने या वादावर काय भूमिका घेतली आहे?
वरिष्ठ नेतृत्वाने दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असून संवादासाठी दार खुले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT