Bjp Leader Pankaja Munde-Dhnanjay Munde
Bjp Leader Pankaja Munde-Dhnanjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : ज्यांचा अहंकार जास्त होतो, त्यांचे राजकारणात नामोनिशाण राहत नाही...

सरकारनामा ब्युरो

बीड : परळीत चुकून झालेला विजय तुम्हाला महागात पडणार आहे, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपले बंधु जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना नाव न घेता दिला. ज्यांचा अंहकार जास्त होतो, त्याचे राजकाणात नामोनिशाण राहत नाही, असा इशारा देतांनाच परळीत माझा फार्म हाऊस नाही, माझा महाल नाही असा टोलाही त्यांनी लगावला. बीड (Beed) जिल्ह्यातील धारूर येथील शेतकरी मेळाव्यात त्या बोलतांना पकंजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधाला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मुंडे भगिणी विरुद्ध धनंजय मुंडे असा आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा सुरू आहे. आज शेतकरी मेळाव्या बोलतांना पकंजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पालकमंत्र्यांना लक्ष्य केल्याचे पहायला मिळाले. पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्याच्या राजकारणात आज जी सर्कस सुरू आहे, त्या सर्कशीत आपण नाहीत, ती बाहेरून पाहायला बरी वाटतेय.

ज्या दिवशी माझ्याकडून जिल्ह्याची बदनाम होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास असेल. स्वर्गातही गोपीनाथ मुंडे यांची मान खाली जाणार नाही, अशा पद्धतीने मी वागते आहे. कधी कुणाचे वाईट केले नाही, कुणाचा चहा पिला नाही, पैसे खाल्ले नाही, त्रास दिला नाही की कारवाईचा धाक दाखवला नाही, असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

हे जे कुणी चुकून निवडून आले आहेत त्यांना ते महागात पडणार आहे. सत्ता असो की नसो कायम जनतेच्या सेवेत राहिलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना आता कामाला लागा, असे आवाहन देखील पंकजा यांनी उपस्थितांना केले. ज्यांचा अंहकार जास्त होतो, त्याचे राजकारणात नामोनिशाण राहत नाही.

आमच्याकडून काही चुकलं असेल, अनवाधानाने काही चुका झाल्या असतील. पण पुन्हा जनतेची सत्ता आणण्यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे. सत्तेच्या खुर्चीवर कोण बसणार याचा विचार कधी गोपीनाथ मुंडेनी केला नव्हता आणि पंकजा मुंडे करते. सत्ता आल्यावर योग्य व्यक्तीला तिथे बसवू, पण त्यासाठी सगळ्यांना पुन्हा कामाला लागा. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT