Pankaja Munde, Gopinath Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : प्रचार संपण्याआधी पंकजांची भावनिक साद; 4 जूनला याच हातांनी मुंडेसाहेबांवर अंत्यसंस्कार...

Sachin Waghmare

Beed News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची शनिवारी सांगता झाली. तत्पूर्वी प्रचार शिगेला पोहचला होता. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची संधी सोडली नाही. एकमेकांवरील टीकेने राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच आता बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सांगतेवेळी माजी मंत्री पंकजा मुंडेंनी भावनिक आवाहन केले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याने सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. शुक्रवारी भाजप (Bjp) उमेदवार पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), माजी मंत्री उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित सांगता सभा घेतली. यावेळी भाषणात पंकजा मुंडेंनी त्यांचे दिवंगत वडिल गोपीनाथ मुंडेंच्या विविध आठवणींना उजाळा दिला. (Pankaja Munde News)

बीड लोकसभा निवडणुकीचा 4 जूनला निकाल लागणार आहे. याच 4 जूनची आठवण सांगत पंकजा मुडेंनी बीडकरांना भावनिक आवाहन केले आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ३ जूनला दिल्लीत अपघाती निधन झाले. त्यानंतर 4 जूनला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे.

4 जून ही निकालाची तारीख आहे, 4 जूनला याच हातांनी मी मुंडेसाहेबांचे अंत्यसंस्कार केले आहेत. मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून मी तुम्हाला मतदान मागत नाही. मला सर्वकाही न मागता मिळाले आहे. विधानसभा न मागता मिळाली, मला लोकसभा न मागता मिळाली. मुंडेसाहेब या जिल्ह्यात, परळीमध्ये सत्कार घ्यायला येऊ शकले नाहीत, माझ्या लोकसभेमध्ये जाण्याने, तो सत्कार घेण्यासाठीच हा 4 जूनला निकाल आहे, असे मला वाटते, असे म्हणत पंकजा मुंडेंनी भावनिक साद घातली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही दिवसापासून मुस्लीम बांधवांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भुलथापा देऊन वेगळाच प्रचार केला जात आहे. मात्र, मी मुस्लीम बांधवांना सांगते, कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे म्हणत मु्स्लीम बांधवांनाही पंकजा मुंडेंनी आदर दिला.

जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका

आरक्षण म्हणजे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे तुम्हाला ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे. अरे, मग मी अगोदरच ओबीसी आहे ना, तुमच्याचसाठी मी आहे. एखादे नेतृत्व तयार व्हायला 50 वर्षे लागतात. त्यामुळे, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही मला निवडून द्या, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले.

SCROLL FOR NEXT