Marathwada : नुकत्याच झालेल्या परळी कृषी उत्पन्न बाजार समिती (Parali APMC News) निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकत भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला होता. या निवडणुकीकडे धनंजय विरुद्ध पंकजा असे देखील पाहिले गेले.
मात्र राष्ट्रवादीने (Ncp) इथे एकहाती वर्चस्व मिळवले. त्यानंतर आज सभापती, उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. (Parli) सभापतीपदी सुर्यभान मुंडे व उपसभापती पदी जयश्री संजय जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने परळी बाजार समितीवर एकहाती विजय मिळवल्यानंतर (Dhnanjay Munde) धनंजय मुंडे यांनी सर्व बहाद्दर मतदारांनी १८ पैकी १८ जागा निवडून देत जो विश्वास व्यक्त केला आहे, तो सार्थ ठरवण्यास कायम कटिबद्ध राहू, असे आश्वासन दिले होते.
आज सभापती, उपसभापतींची निवड झाल्यानंतर देखील या निवडणुकीत शेतकरी-कष्टकरी वर्गाला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी कायम कटिबद्ध राहून शेतकरी हितार्थ निर्णय नवनिर्वाचित सभापती, उपसभापती घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला होता. अंबाजोगाई, बीड, परळी, गेवराई, आणि वडवणीत आघाडीने सत्ता मिळवली. जिल्ह्यातील नऊ पैकी पाच बाजार समित्या राष्ट्रवादी प्रणित आघाडीने जिंकल्या. तर, एक बाजार समिती विविध पक्षांच्या परिवर्तन महाआघाडीने जिंकली. भाजपने कडा, पाटोदा व केज बाजार समिती जिंकल्या आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.