baban gitte bapu andhale  sarkarnama
मराठवाडा

Parali Firing Case Update : परळी गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, खून झालेल्या बापू आंधळेंवर गुन्हा दाखल

Roshan More

Parali Firing Case : परळीतील बँक कॉलनी परिसरात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार झाला या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हदरला होता. या प्रकरणात ज्या महादेव गित्तेंवर गुन्हा दाखल झाला होता त्यांच्या फिर्यादीनुसार मृत सरपंच बापु आंधळे यांच्यासह 15 ते 20 जणांवर परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महादेव गित्ते हे जखमी आहेत. त्यांचा पोलिसांनी जबाब घेतला. त्यानुसार पोलिसांनी मृत बापू आंधळे यांच्यासह राजेश उर्फ धनराज श्रीरंग फड, रघुनाथ फड, ग्यानोबा उर्फ गोट्या मारोती गित्ते, सनी देवडे, सोमनाथ सलगरे, वाल्मिक अण्णा व इतर अनोळखी 15 ते 20 जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) नेते, बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर परळी शहर पोलिस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार आंधळे यांचा खून हा आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

रोहित पवारांचा आरोप

परळीत धनंजय मुंडे यांचे खुप काही चालतं असं नाही. कारण त्यांचा राईट आणि लेफ्ट हँड परळी चालवतात. त्यांच्या वतीने काही करण्यात आलं आहे का? हे पाहिले पाहिजे. आमच्या बबन गित्ते यांनी परळीत बोगस मतदान झालं हे समोर आणल होतं. त्याचा हा राग असावा, असे रोहित पवार म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT