Shivsena : हाॅटेल चालकांची शिवसैनिकांकडून मध्यरात्री 'धुलाई', पोलिसांची उडाली तारांबळ

Shivsena Rajesh Kshirsagar : स्टेशन रोड-व्हिनस कॉर्नरवरून महिलांना प्रवास करने मुश्किल झाले होते. महिलांच्या छेडछाडीचे प्रकार देखील येथे घडले होते. या संदर्भात काही महिलांनी शिवसेनेकडे तक्रार केली होती.
Shiv Sainiks Shivsena
Shiv Sainiks Shivsena sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Political News : कोल्हापूर शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या स्टेशन रोड-व्हिनस कॉर्नर येथील देहविक्री व्यवसायावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत होती. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती.

त्यामुळे शिवसेना स्टाईलने शिंदे गटाने बुधवारी मध्यरात्री अचानक छाप टाकून देहविक्री व्यवसाय करणाऱ्या हाॅटेल चालकांची धुलाई केली. या सर्व प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते.

सायंकाळी 6 नंतर स्टेशन रोड-व्हिनस कॉर्नरवरून महिलांना प्रवास करणे मुश्किल झाले होते. महिलांच्या छेडछाडीचे प्रकार देखील येथे घडले होते. या संदर्भात काही महिलांनी शिवसेनेकडे तक्रार केली होती.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर Rajesh kshirsagar यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने शहरात खुलेआम सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाला चाप बसावा यासाठी आंदोलन करण्यात आले. हा व्यवसाय करणाऱ्या हाॅटेलचालकांना शिवसेना स्टाईलने चोप देण्यात आला. देहविक्री करणाऱ्या काही महिलांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Shiv Sainiks Shivsena
Hemant Soren News : हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार; चंपाई सोरेन यांनी दिला राजीनामा!

शिवसैनिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांची चांगली तारांबळ उडाली. रात्री शिवसैनिकांनी स्टेशन ते विनोद कॉर्नर परिसरात मोठी गर्दी केली होती. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी ज्यादा कुमक मागवून या ठिकाणी पोलिस Police बंदोबस्त तैनात केला होता.

(Edited By Roshan More)

Shiv Sainiks Shivsena
Manoj Jarange : शंभूराज देसाई मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावतील, जरांगेंचा विश्वास !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com