Mla Ratnakar Gutte News, Parbhani
Mla Ratnakar Gutte News, Parbhani Sarkarnama
मराठवाडा

Parbhani : वर्षभरात २५ मर्डर झाले, हा एसपी काय करतो? गुन्हा दाखल होताच गुट्टे भडकले..

राजेश काटकर

परभणी : पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यामुळे रासपचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) चांगलेच भडकले आहेत. जिल्ह्यात व गंगाखेडमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, पोलिस हप्ते घेतात या विरोधात आवाज उठवला तर माझ्यावर गुन्हा दाखल करतात. (Parbhani) पण कितीही गुन्हे दाखल केले तरी माझा संघर्ष थांबणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत तो सुरूच राहील, अशा शब्दात गुट्टे यांनी डीवायएसपी, एसपी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

परभणीला एसपी आल्यापासून वर्षभरात २५ मर्डर झाले, माझ्या कार्यकर्त्यांवर डीवायएसपीने खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप देखील गुट्टे यांनी केला. (Marathwada) २९ आॅगस्ट रोजी गंगाखेड येथे झालेल्या शांतता समितीची बैठक चांगलीच वादळी ठरली. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार गुट्टे यांना यावेळी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र बैठकीत त्यांनी थेट पोलिसांवरच हप्तेखोरीचे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर काल पोलिसांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात रत्ननाकर गुट्टे यांच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यामुळे गुट्टे अधिक संतापले आणि त्यांनी पोलिस अधिक्षक, उपअधिक्षक यांच्यावरच आरोप केले. गुट्टे म्हणाले, डीवायएसपी श्रनिक लोढा हे एसपी जयंत मीना यांच्या दबावात काम करतात, त्यांनी यापुर्वी माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते अजूनही माझ्याकडे येऊन रडतता.

त्यादिवशीच्या बैठकीत मी अवैध धंदे आणि पोलिसांच्या हप्तेखोरीबद्दल बोललो तर माझे काय चुकले? लोकप्रतिनिधी म्हणून अशा गोष्टींना आळा घालणे हे माझे कामच आहे. पण पोलिसांनी उलट माझ्याविरोधातच गुन्हा दाखल केला. पण गुन्हा दाखल केला म्हणून माझा अवैध धंदे आणि पोलिसांच्या हप्तेखोरी विरुद्धचा संघर्ष थांबणार नाही, तो शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहील. परभणीचे एसपीस आल्यापासून वर्षभरात जिल्ह्यात २५ मर्डर झाले आहेत, मग हा एसपी काय करतो? असा सवाल करत एसपी, डीवायएसपींवर तातडीने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील गुट्टे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT