BJP News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani BJP Politics : आमचेही ऐका ! भाजपच्या ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता...

BJP News : ज्येष्ठ कार्यकर्त्याला आपले म्हणणेसुद्धा मांडण्याची संधी मिळत नसल्याची भावना त्यांच्यामध्ये दिसून आली.

Prasad Shivaji Joshi

Marathwada Political News : संपूर्ण आयुष्य पक्षाकार्यासाठी वाहून दिल्यानंतर सद्यःस्थितीत आमचे म्हणणे ऐकूनही घेतले जात नाही, ही व्यथा आहे परभणी जिल्ह्यातील भाजपच्या ज्येष्ठांची. (BJP Political News) रविवार, दि. १७ रोजी परभणी येथे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मराठवाडा विभाग संघटनमंत्री संजय कौडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाचे काही ज्येष्ठ नेते आपले म्हणणे मांडण्यासाठी उभे राहिले. मात्र, त्यांना बोलण्याची संधी न देता त्यांना खाली बसवण्यात आले. (Parbhani) या प्रकारामुळे उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून आली. (Marathwada) पक्षाच्या स्थापनेपासून ज्यांनी कार्य केले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघटन उभे केले, कार्यक्रम राबवले. त्यावेळी पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेते समान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकत होते.

विशेषत: संघटनमंत्री पक्ष संघटना मजबूत राहण्यासाठी सर्वांशी संवाद साधायचे. मात्र, सद्यःस्थितीत ज्येष्ठ कार्यकर्त्याला आपले म्हणणेसुद्धा मांडण्याची संधी मिळत नसल्याची भावना त्यांच्यामध्ये दिसून आली. (BJP) भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी नुकतीच जम्बो कार्यकारिणी जाहीर केली होती. परंतु यामध्ये अनेक नवख्या कार्यकर्त्यांना संधी दिली असली तरी वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्यांना डावलण्यात आल्याची भावना काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये होती.

त्यामुळे `पार्टी विथ डिफरन्स`मध्ये पक्ष कार्यापेक्षा लोकप्रतिनिधींची मर्जी व रेफरन्स हाच महत्त्वाचा निकष असल्याचे दिसून आले होते. या नव्या कार्यकारिणीच्या विरोधात असंतोष असल्याने त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीतदेखील याची प्रचिती आली. ज्येष्ठांना बोलूच न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठांची नाराजी भाजपला येणाऱ्या काळात महागात पडू शकते, अशीदेखील चर्चा यानिमित्ताने होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT