Parbhani Shivsena UBT News : परभणी महापालिका निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर पदाचा सस्पेंस संपला. चंद्रपूरच्या धरतीवर परभणीत चमत्काराची आशाही मावळली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सय्यद इक्बाल या आपल्या निष्ठावंत शिवसैनिकाला महापौर करत सगळ्यांनाच धक्का दिला. विरोधक टीका करण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे महापौर इकबाल सय्यद यांनी मात्र कामाला सुरवात केली आहे. 'आतापर्यंत जे कधीच झाले नाही, ते आम्ही करून दाखवू', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौरपदाचा पदभार व शहरातील प्रमुख समस्यांवर महापौर सय्यद इकबाल यांनी आपली भूमिका 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केली. आम्ही कामकाजाला सुरुवात केलीच आहे. लवकरात लवकर पदभार घेऊन अधिकृतरित्या काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महापौर व उपमहापौरांची दालने गेल्या अनेक वर्षापासून बंद होती. त्याच्या स्वच्छतेचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. कदाचित सोमवारी (ता.16) आम्ही प्रत्यक्ष पदभार हाती घेऊ.
शहरात अनेक समस्या आहेत परंतु सध्या कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देणार आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी संबंधीत एजन्सीला विश्वासात घेऊन त्यांनी नियमितपणे कचरा संकलन व त्यावर प्रक्रिया करावी यासाठी आमचे प्राधान्य राहील. परंतु मी एक सांगतो, महापालिकेच्या इतिहासात जे आत्तापर्यंत झालेच नाही, तसे काम आम्ही करून दाखवू. हा निर्धार नव्हे तर संकल्प आहे. शहरातील साडे तीन लाखांवर जनता आता माझी आहे. त्यांनी आमच्या पक्षावर, माझ्यावर विश्वास दाखवला. तो विश्वास निश्चितच सार्थ ठरवू, असा शब्द महापौर सय्यद इकबाल यांनी दिला.
महापौरपदी सय्यद इकबाल, उपमहापौरपदी गणेश देशमुख यांची गुरुवारी निवड होताच दोघेही सक्रीय झाले आहेत. मात्र या जोडीपुढे अनेक समस्यांचे मोठे आव्हान आहे. विरोधी बाकावरील 27 सदस्यांचा दबाव व नागरीकांच्या वाढलेल्या अपेक्षांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.
मात्र त्यांना खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे व माजुलाला , शेख कादर यांची भक्कम साथ व मार्गदर्शन असल्याने हे युवा नेतृत्व नव्या विचार व दिशेने व्हिजन घेऊन काम करेल अशी परभणीकरांना अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.