Sanjay Kenekar News: विकास आराखड्यात हिंदू धार्मिक स्थळ 'टार्गेट'; संजय केनेकर यांचे वराती मागून घोडे

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास आराखडा करताना यात शहराचे ग्रामदैवत असलेले संस्थान गणपती मंदिर, सुपारी हनुमान मंदिर सुद्धा बाधित होत आहे. हे कसे काय होऊ शकते ? एकंदरीत या प्रकरणात अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे.
MLA Sanjay Kenekar Vision News
MLA Sanjay Kenekar Vision NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : छत्रपती संभाजीनगर शहर विकास आराखडा हा अंतिम टप्यात आला आहे. असे असताना आज महापालिका निवडणुकीची घोषणा आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही मिनिटे आधी भाजपचे आमदार संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांनी आराखडा तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर काही आरोप केले. आराखडा तयार करताना हिंदू धार्मिक स्थळांना टारगेट करण्यात आले आहे, इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांना मात्र वाचवण्यात आल्याचा गंभीर आरोप केनेकर यांनी पत्रकार परिषदेतून केले.

शहराचे ग्रामदैवत आणि दीड-दोनशे वर्षापुर्वीचे संस्थान गणपती, सुपारी मारोती, हिंगलजा माता, दक्षिणमुखी हनुमान मंदिरासह अनेक जुनी पुरातन ऐतिहासिक हिंदूची धार्मिक स्थळ या विकास आराखड्यात बाधित होणार आहेत.

दुसरीकडे इतर धर्मियांच्या स्थळांना मात्र हेतुपूस्पर वाचवण्यात आले असून हा विकास आराखडा तयार करताना दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप केनेकर यांनी केला आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास आराखडा करताना यात शहराचे ग्रामदैवत असलेले संस्थान गणपती मंदिर, सुपारी हनुमान मंदिर सुद्धा बाधित होत आहे. हे कसे काय होऊ शकते ? एकंदरीत या प्रकरणात अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे.

MLA Sanjay Kenekar Vision News
Ajit Pawar NCP : भाजपसोबत जुळलं नाही, शरद पवारही जवळ करेनात...; अजितदादांची राष्ट्रवादी पडली एकाकी

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा विषय मांडणार आहे. शहराचा विकास आराखडा तयार करताना डीपी युनिटचे त्तकालीन प्रमुख रजा खान यांनी हेतू पुरस्कर सरकारी मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केले.

त्यानंतर आलेल्या श्रीकांत देशमुख नावाच्या अधिकाऱ्यांनीही त्यात काही बदल न करता त्याच आधारावर नियोजन आराखडा बनविला. या आराखड्यात शहरातील दहा ते पंधरा मुख्य मंदिरे बाधित होत आहेत. यात संस्थान गणपती आणि गुलमंडीवरील सुपारी हनुमान मंदिर सुद्धा आहे. यामुळे नियोजित आराखड्याची मदत घेऊन महापालिका या धार्मिक स्थळांवर भविष्यात कारवाई करू शकते. दुसरीकडे काही धार्मिक स्थळांना मात्र अभय दिल्याचे दिसते.

MLA Sanjay Kenekar Vision News
Walmik Karad News : 'बघून घेतो म्हणून धमकी, जेलरच्या सांगण्यावरून 'त्या' पोलिसाची तक्रार नाही; वाल्मिक,घुलेनं माफी मागितली?

मुळात या विकास आराखड्यात जुना गाव नकाशा जुळवलेला नाही. यात अशी अनेक प्रकरणे आहेत. याबाबत मागील दोन महिन्यांपासून महापालिकेकडे माहिती मागविण्यात आली. परंतू संबंधित अधिकाऱ्यांनी ती उपलब्ध करुन दिली नाही. हा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेणार असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ही करणार असल्याचे केनेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com