eknath shinde, saieed khan, hseeb khan Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, पाथरी नगरपालिकेतील दोन नगरसेवकांचा तडकाफडकी राजीनामा; संख्याबळ घटल्याने नगराध्यक्षासमोरील अडचणीत भर!

Saeed Khan faces setback News : पाथरी मतदारसंघ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून परभणीच्या राजकारणात आपला जम बसवू पाहणाऱ्या सईद खान यांना त्यांच्याच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी अडचणीत आणले आहे.

Jagdish Pansare

Pathri municipal council : विधान परिषदेचे आमदार सईद खान यांनी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना टक्कर देत नगर परिषदेची सत्ता खेचून आणली. त्यांनी नगराध्यक्षपदावर स्वतःच्या भावाला बसवले. पाथरी मतदारसंघ आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून परभणीच्या राजकारणात आपला जम बसवू पाहणाऱ्या सईद खान यांना त्यांच्याच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी अडचणीत आणले आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) ताब्यात असलेल्या नगर परिषदेच्या कारभारावरच या नगरसेवकांनी बोट ठेवत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगरसेवक पदांचे राजीनामे दिले आहेत. आमदार सईद खान यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातो. नगरपालिकेतील भ्रष्ट कारभार, नागरी समस्यांकडे होणारे दुर्लक्ष याला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे या दोन नगरसेवकांनी म्हटले आहे.

पाथरी नगरपरिषदेतील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत नगरसेवक हसीब खान आणि आलम तरन्नुम बेगम मुजीब यांनी राजीनामा दिला आहे. पाथरी नगरपरिषदेतील भ्रष्टाचार, अनियमित कारभार आणि शहरातील मूलभूत नागरी समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचा दावा प्रभाग क्रमांक सातमधील नगरसेवक हसीब खान आणि मुजीब आलम यांनी केला आहे.

शहरातील वाढती अस्वच्छता, ठिकठिकाणी साचलेला कचरा, नागरिकांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच नगरपरिषदेच्या कामकाजातील दिरंगाई आणि निष्क्रियतेबाबत दोन्ही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या दोन नगरसेवकाच्या राजीनाम्यानंतर पाथरी नगरपालिकेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे संख्याबळ 9 वरून 7 झाले तर काँग्रेस 12 व राष्ट्रवादी 2 असे विरोधकांचे संख्याबळ 14 असल्याने येत्या काळात कामकाज करण्यास आमदार सईद खान व भाऊ नगराध्यक्ष आसेफ खान यांना जड जाणार असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT