Mahadev Jankar bike rally : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी, दुचाकीवरून प्रवास केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का? याची चर्चा रंगली आहे.
सर्वसामान्य व्यक्ती दुचाकीवरून जाताना, ट्रिपल सीट दिसला किंवा, हेल्मेट घातलं नाही, किंवा वेगाची मर्यादा सोडून चालल्यास थेट कायदेशीर कारवाई करते. आता हीच कारवाई, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यावर होणार का? अशी चर्चा आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी, महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. 2016 ते 2019 या काळात महाराष्ट्र राज्यातील पशुपालन, दुग्धविकास व मत्स्य विकास मंत्री होते. असे असताना, महादेव जानकर यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव इथं काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले महादेव जानकर यांनी थेट दुचाकीवरूनच ट्रिपल सीट प्रवास केला. महादेव जानकर यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहे.
महादेव जानकर बसलेल्या दुचाकीवर, ते मध्यभागी आहे. चालक आणि एक जण मागे बसलेला आहे. दुचाकीवर मागे बसलेला हा उमेदवार असल्याचे सांगितले जाते. मागे बसलेले जानकर, त्यांच्या मागे बसलेला व्यक्ती, हा हात उंच करून, अभिवादन करत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची काँग्रेसबरोबर युती आहे.
कार्यकर्ते आपल्या नेत्याला फाॅलो करतात, महादेव जानकर यांचा पक्ष, संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यांचे हजारो कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते नेत्यांना फाॅलो करून, अनुकरण करतील, असे म्हटले जाते. त्यामुळे यावर कायदेशीर कारवाई होणार का? सर्वसामान्य दुचाकीस्वार असल्यावर लगेचच कारवाई होते. आता नेतेच नियमांचे उल्लंघन करत असल्याने पोलिस काय कायदेशीर कारवाई करणार, याकडे लक्ष लागलं आहे.
मोटार वाहन कायदाच्या नियमांनुसार दुचाकीवर फक्त चालक अन् आणख एक जण, असा दोघे प्रवास करू शकतात. दुचाकीवर तिसरा प्रवासी बसवणे हे वाहनाचं ओव्हरलोडिंग मानलं जातं आणि कायद्याने बंदी आहे. महाराष्ट्रात 2025-26 च्या नियमांनुसार ट्रिपल सीटवर प्रवास केल्यास पहिल्यादा 1,000 रुपये इतका दंड होतो.
वेळप्रसंगी गंभीर बाब म्हणून, चालू वैध ड्रायव्हिंग लायसन्स 90 दिवसांसाठी निलंबित देखील होऊ शकते. दंडात्मक कारवाई करताना पोलिस ई-चलन मोबाईलवर पाठवून देऊ शकतात. इथं काय कारवाई होते, याची चर्चा आणि लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.