Rohit Pawar Emotional : दादा, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा.., एकदा घट्ट मिठी मारायचीय..; रोहित पवार रक्षादर्शनावेळी हेलावले

Rohit Pawar Gets Emotional During Ajit Pawar Asthi Darshan in Pune Baramati : अजित पवार यांच्या रक्षादर्शनावेळी रोहित पवार यांना अनावर झालेल्या भावनांना त्यांनी समाज माध्यमांवरून वाट मोकळी करून दिली.
Rohit Pawar Emotional
Rohit Pawar EmotionalSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Asthi Darshan : अजितदादांच्या पार्थिवाला काल मुखाग्नि दिल्यानंतर आज सकाळी पवार कुटुंबियांनी रक्षादर्शन घेतलं. या वेळी रोहित पवार भावूक झाले. रोहित पवार यांनी आपल्या भावनांना सोशल मीडियावर पोस्ट लिहून मोकळी वाट करून दिली आहे.

'दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की, फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक, त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल..,' असे म्हणत भावनांना मोकळी वाट करून देताना, दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..,Love U दादा! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट लिहिताना, दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करू…’ असे म्हणतील, असे भावनात्मक पोस्ट शेअर केली आहे.

रोहित पवार यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, अजितदादांनी (Ajit Pawar) जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली, तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे. मन बर्फाप्रमाणे थिजलंय. तुमच्या केलेली प्रत्येक भेट, त्यातील चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत, असे म्हटलं आहे.

Rohit Pawar Emotional
Akola Mayor : भाजपच्या विजयानंतर अकोला महापालिकेत 'काँग्रेस-AIMIM'चा राडा; संतप्त नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावले, बांगड्यांची फेकाफेक

पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस, असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते, तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर,’’ असे भावनाविवशपणे म्हटले आहे.

Rohit Pawar Emotional
Raigad Khopoli Murder : मंगेश काळोखे हत्या प्रकरण पेटलं! कोटींची सुपारी, हल्लेखोर देवकरांच्या ऑफिसमध्ये? आमदार थोरवेंच्या आरोपांनी राजकारण हादरलं

अजितदादांविषयी भावनात्मक तक्रार करताना, रोहित पवार पुढे म्हणतात, "तुमच्याविषयी माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाही. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होत आहे. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com