परभणी : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. अनेक जिल्ह्यातील पक्षाचे नेते सोडून जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेत आहेत, त्यामुळे पक्ष वाचविण्याचे मोठे आव्हान ठाकरेंपुढे उभे ठाकले आहे. परभणीतील (Parbhani) लोकप्रतिनिधींनी मातोश्रीवर आपली निष्ठा दाखवली असली तरी शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी मात्र शिंदे गटात दाखल होत आहेत. (Parbhani Upazila Chief of Shiv Sena Manik Pondhe joined Eknath Shinde group)
परभणी जिल्ह्यातील शिवसेनेत अखेर फूट पडली. शिवसेनेचे विद्यमान उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माणिक पोंढे पाटील यांनी शनिवारी (ता. ३० जुलै) शिंदे गटात प्रवेश केला. माणिक पोंढे यांच्यासह परभणी जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक व जुने पदाधिकारीदेखील शिंदे गटात दाखल झाले आहेत.
परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे बहुतांश लोकप्रतिनिधी आपण ठाकरेंशी प्रामाणिक आहोत, असे म्हणत निष्ठा दाखवली. ते मातोश्रीशी एकनिष्ठ राहिले आहेत. परंतु परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक व काही नाराज पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू होती. त्यामुळे परभणीतील काही शिवसैनिक व पदाधिकारी शिंदे गटात दाखल होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती, त्यानुसार ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते तथा कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य प्रवीण देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ आता शिवसेनेचे परभणी उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माणिक पोंढे पाटील हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यांनी शनिवारी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.