Parbhani Dome Collapse 6 Killed sarkarnama
मराठवाडा

Parbhani Dome Collapse : परभणी जिल्ह्यात मोठी दुर्घटना : हनुमान मंदिराचा घुमट कोसळून 6 भाविक ठार, 15 ते 20 जण गंभीर जखमी!

Parbhani Dome Collapse 6 Killed : शनिवार असल्याने हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकाची गर्दी होती. दर्शन घेत असतानाच दुपारी तीन वाजता अचानक नवा घुमट कोसळला.

Jagdish Pansare

Marathwada News : परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरील नव्याने उभारण्यात येणारा घुमट कोसळून 6 भाविक ठार झाले आहेत. ढिगाऱ्याखाली पंधरा ते वीस भाविक दबून गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत्यांच्या संख्येत वाढ होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.

मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. प्रत्येक शनिवारी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी होते. या ठिकाणी गर्भगृहासमोरील नव्याने घुमट उभारण्याचे काम सरु होते. पिल्लर उभे करण्यात आल्यानंतर घुमट उभारण्यात आला होता. आज शनिवारी दुपारी भाविक दर्शन घेत असताना अचानक मंदिराचा घुमट कोसळला.

या मंदिराच्या शेजारीच अन्नदानाचा कार्यक्रम सुरू होता. शनिवार असल्याने हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकाची गर्दी होती. दर्शन घेत असतानाच दुपारी तीन वाजता अचानक नवा घुमट कोसळला आणि त्याखाली भाविक दबले. यात पाच ते सहा भाविकांचा दबून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तर इतर भाविक 15 ते 20 भाविक जखमी झाले आहेत. जखमींना आरपी हॉस्पिटल परभणी व ग्रामीण रुग्णालय मानवत येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त समजताच आमदार राजेश विटेकर, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, सहायक पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. जखमी व मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून संपूर्ण ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT