Amit Shah: आता केवळ एकच शिवसेना! अमित शहांकडून 3 वाक्यातच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपल्याचे संकेत

Amit Shah, Operation Tiger, Eknath Shinde: ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच खरी शिवसेना म्हटले. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि घुसखोरीच्या मुद्द्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.
amit shah
amit shahsarkarnama
Published on
Updated on

Amit Shah: ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. शाह यांनी भाषण करत असताना ठाकरेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विधानाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

amit shah
Eknath Shinde Shivsena: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका? आष्टीकर, वाजेंनंतर 48 तासांतच ठाकरेंचा तिसरा खासदारही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

व्यासपीठावर बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उपस्थितांची नावे घेत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत महत्त्वाचे विधान केले आहे. पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बोलताना 'शिवसेना- एकनाथ शिंदे गट' असे म्हणत होते. पण आता कोणताच गट शिल्लक राहिला नाही. केवळ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन टायगरचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे.

पश्चिम बंगालच्या जनतेने देखील भाजपला साथ दिली आहे. जे म्हणत होते भाजप कुठे कुठे पोहचणार, पण भाजप सर्व ठिकाणी पोहोचली आहे. यापुढे घुसखोरी करणाऱ्यांना एक एकेला शोधून शोधून मारू. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत.

amit shah
Shivsena Vs BJP: अब हमारी बारी..! धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी; भाजपला 'जोर का झटका'

काँग्रेससोबत असणारे घूसखोरांना वोट बँक बनवत आहेत. पण कान उघडे ठेवून ऐका. हा देश धर्मशाळा नाही. जे या देशात जन्मले आहेत तेच या देशात राहतील. अशा शब्दात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घुसखोरांना ठणकावले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com