NCP leader Khaisar Rajakhan Pathan after being declared unopposed Deputy President of Parli Municipal Council, as BJP councillors remained absent during the election meeting. sarkarnama
मराठवाडा

Parli NagarPalika: धनंजय मुंडेंच्या परळीत ऐनवेळी भाजपची माघार; महायुतीत वाढला तणाव; उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीनेच राखलं

Parli Municipal Council News : परळी नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खैसर राजाखान पठाण बिनविरोध निवडले गेले, भाजप नगरसेवक गैरहजर राहिल्याने महायुतीत तणाव वाढला नगराध्यक्ष राष्ट्रवादीकडे कायम ठेवण्याचा निर्णय स्पष्ट झाला.

Jagdish Pansare

Beed Nagarpalika News : परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पद्मश्री धर्माधिकारी विजयी झाल्या. आता उपनगराध्यक्षपदही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आले असून या पदावर खैसर राजाखान पठाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पीठासिन अधिकारी तथा नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी यांनी उपनगराध्यक्ष निवडीसाठी बोलविलेल्या सभेला सभेला भाजपचे नगरसेवक अनुपस्थित होते. दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी खैसर पठाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, निवडणुक महायुतीने लढविताना नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व उपनगराध्यक्ष भाजपचा होईल,असे मानले जात होते. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी लॉबींगही केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हे पद आपल्याकडेच ठेवल्याने भाजपचा (BJP) हिरमोड झाला. शिवसेनेचे दोनच नगरसेवक असताना राष्ट्रवादीने त्यांना एक स्विकृत नगरसेवकपद दिले.

भाजपचे सात सदस्य असताना व महायुती मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असताना मात्र भाजप दुर्लक्षित आहे. प्राधिकृत अधिकारी म्हणून गेवराई नगरपरिषद मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, परळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे आदिंची कामकाज पाहिले.

स्वीकृत सदस्यांच्या निवडीवेळी भाजपची एन्ट्री

दरम्यान, उपगनरगराध्यक्षांच्या निवडीनंतर स्विकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रीया सुरु झाली. यावेळी भाजप सदस्यांनी सभागृहात एन्ट्री केली. राष्ट्रवादी व मित्रपक्षाकडून राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी तसेच आजीज कच्छी तसेच शिवसेनेचे देवीप्रसाद उर्फ राजा पांडे तर भाजपचे प्रणव मराठे यांची निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांचाही अर्ज होता. मात्र, त्यांच्याकडे निवडीपुरते मतांचे मुल्य नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT