Pankaja Munde, Dhananjay munde, Fulchand Karad Sarkarnama
मराठवाडा

Parli Vaijnath Political News : 'संस्था बंद पाडून मुंडे भावंडांनी परळीचा रोजगार पळविला'; कराडांचा गंभीर आरोप

Fulchand Karad on Munde's : परळीच्या औद्योगिक वसाहतीचा प्रश्न दोघेही मार्गी लाऊ शकले नाहीत. नवीन विकास योजना किंवा रोजगाराचा प्रकल्प आणण्याऐवजी त्यांनी चांगल्या स्थितीमध्ये असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद पाडला.

Dattatrya Deshmukh

Beed News : मागील दहा वर्षांत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे आलटून पालटून सत्तेत आहेत. त्यांनी तालुक्यात रोजगाराच्या कुठल्याच संधी उपलब्ध केल्या नाहीत. उलट वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणी अशा संस्थांची वाताहत करून त्या बंद पाडल्या. त्यामुळे तालुक्याचाच रोजगार पळविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फुलचंद कराड यांनी केला.

लोकसभा निवडणुकीबाबत (Loksabha Eletion) महाविकास आघाडीतील (MVA) मित्रपक्षांची मोर्चेबांधणी करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुदामती गुट्टे, प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्याबद्दल फुलचंद कराड यांचा सत्कार करण्यात आला. एकेकाळी फुलचंद कराड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांचे कट्टर समर्थक होते. भगवान सेनेचे ते सरसेनापती होते. पुढे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, दिवंगत मुंडे लोकसभा निवडणुकीला उभारल्यानंतर ते पुन्हा भाजपत आले. मागच्या अनेक वर्षांपासून ते दिवंगत मुंडे व पुढे पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत होते. आता त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. A serious allegation on Pankaja Munde and Dhananjay Munde.

फुलचंद कराड (Fulchand Karad) म्हणाले, परळीचे नेतृत्व करत असलेल्या मुंडे बहीण - भावाकडे विकासाची कुठलीच दृष्टी नाही. दोघेही आलटून पालटून सत्तेत मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, परळीच्या औद्योगिक वसाहतीचा प्रश्न दोघेही मार्गी लाऊ शकले नाहीत. नवीन विकास योजना किंवा रोजगाराचा प्रकल्प आणण्याऐवजी त्यांनी चांगल्या स्थितीमध्ये असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद पाडला.

यामुळे शेतकऱ्याच्या उसाचा गाळपाचा प्रश्न गंभीर बनला असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. हीच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीची अवस्था आहे. मागील दहा वर्षांत त्यांनी फक्त विकासाच्या गप्पाच मारल्या असल्याचा आरोप फुलचंद कराड यांनी केला. 10 वर्षे खासदार असलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी विकासाचे एकही ठोस काम केले नाही. म्हणूनच पक्षाने त्यांची उमेदवारी काटली.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT