Dhule Lok Sabha Constituency : भाजप लागला प्रचाराला; पण काँग्रेसला उमेदवारच मिळेना...!

Loksabha Election 2024 : राहुल गांधी यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा नंदूरबार, धुळे मार्गे महाराष्ट्रात आली होती. या कालावधीत राहुल गांधी यांनी नंदूरबार आणि धुळे मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रित केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उत्साहित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गांधी यांची पाठ फिरताच पक्ष पुन्हा निष्क्रीय झाल्याचे चित्र आहे.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha ConstituencySarkarnama

Dhule, 05 April : धुळे लोकसभा मतदारसंघ प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघात यंदा भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेसचा अद्याप उमेदवाराचा शोध सुरूच आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) धुळे आणि नंदूरबार या दोन जागा मिळाल्या आहेत. येथे पक्षाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला चालना मिळावी म्हणून काँग्रेसची राज्यस्तरीय लोकसभा आढावा बैठक धुळे येथे घेण्यात आली होती.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना तातडीने उमेदवार शोधण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्यापही स्थानिक नेत्यांना उमेदवारांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhule Lok Sabha Constituency
Dharashiv Lok Sabha Constituency : 'मित्रां'ची नाराजी दूर करण्याचे राणा पाटलांसमोर चॅलेंज!

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रा नंदूरबार, धुळे मार्गे महाराष्ट्रात आली होती. या कालावधीत राहुल गांधी यांनी नंदूरबार आणि धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) विशेष लक्ष केंद्रित केले होते.

त्यांनी आदिवासी तसेच शेतकऱ्यांचे मेळावे घेतले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उत्साहित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधी यांची पाठ फिरताच पक्ष पुन्हा निष्क्रीय झाल्याचे चित्र आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत भारतीय जनता पक्षातच फारसा उत्साह नाही. त्यांच्या विरोधात नऊ इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. भाजपमध्ये (BJP) असा उत्साह आहे. मात्र, काँग्रेसकडे उमेदवारच सापडत नाही.

त्यामुळे अगदी निरुत्साहाचे वातावरण आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही स्थानिक नेत्यांनी फारशी हालचाल केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांनी उमेदवार नसल्यास ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला द्यावी, असा आग्रह धरला आहे.

Dhule Lok Sabha Constituency
Bacchu Kadu On Ravi Rana : राणांनी काँग्रेसची 'बी-टीम' म्हणून डिवचलं, कडूंनी थेट 'स्वाभिमाना'वर ठेवलं बोट

काँग्रेस पक्षाकडे आमदार कुणाल पाटील हे प्रबळ उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र, त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. धुळे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे दोघे संभाव्य उमेदवार आहेत.

मात्र, ते कितपत प्रभावी असतील, याबाबत पक्षालाही संशय आहे. त्यानंतर नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव पुढे आले. मात्र, मालेगाव आणि धुळे या प्रमुख शहरांवर प्रभाव टाकील असा उमेदवार अद्याप काँग्रेसला मिळू शकलेला नाही. काँग्रेसचा त्यासाठी शोध सुरूच आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. भाजपने प्रचारही सुरू केलेला आहे. अशा स्थितीत प्रतिस्पर्धी काँग्रेसला अद्याप उमेदवाराचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सहकारी पक्षही नाराज आहेत. आता या पक्षांकडून काँग्रेसवर प्रभावी उमेदवार शोधा अथवा जागा सहकारी पक्षाला द्या, असा दबाव येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात, याची उत्सुकता लागली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Dhule Lok Sabha Constituency
Daund politics : सुनेत्रा पवारांसाठी कट्टर विरोधक दहा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com