Lok Sabha Security Breach Sarkarnama
मराठवाडा

Parliament Security Breach Case : तुमच्या मुलाला कोण भेटायचं? दिल्ली पोलिसांची अमोलच्या आई-बाबांकडे विचारणा

Parliament Winter Session : अमोलचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात.

Mangesh Mahale

Parliament Breach 2023: संसद भवनात घुसखोरी करणारा आरोपी अमोल शिंदेचे आई-वडील आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. दिल्ली पोलिसांनी रविवारी त्यांची कसून चौकशी केली. "तुमच्या मुलाला कोण भेटायला येत होते," अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्यात आले.

दिल्ली पोलिस रविवारी अमोल शिंदेच्या चाकूर गावातील झरी गावात पोहोचले. या पथकात चार पोलिस अधिकारी होते. त्यांनी अमोलच्या आई-वडिलांचा जाब नोंदवला. अमोल शिंदेचा संपर्क कोणत्या यंत्रणेशी होता, तुम्हाला याबाबत काही माहिती होती का? असे प्रश्न दिल्ली पोलिसांनी विचारल्याचे समजते. या चौकशीबाबत स्थानिक पोलिसांनी गुप्तता पाळली होती.

देशाचे सर्वोच्च सभागृह मानले जाणा-या संसदेत तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील अमोल शिंदे व त्याच्या मित्रांनी घुसखोरी करून गोंधळ घातला. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. संसदेवर अशाप्रकारे कुणी घुसखोरी करून गोंधळ कसा घालू शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. संबंधित प्रकरणानंतर पोलिस प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.

पोलिस प्रशासनाने तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी घोषणाबाजी करीत अमोलने संसद भवन परिसरात पिवळा धूर सोडला होता. तो लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा आहे. अमोलचे त्याचे आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दुसरीकडे अमोल हा शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT