Sujay Vikhe: विरोधक एकाच विकासकामावर वर्षानुवर्षे मते मागतात; सुजय विखेंचा टोला

Nagar Politics: साखळाई पाणी योजनेवर केवळ राजकारण झाले.
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Nagar: नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. "एकाच विकासकामावर ते वर्षानुवर्षे मते मागण्याची त्यांच्याकडे कला आहे. याला मी आळा घातला. त्यामुळे ते मला विरोध करणारच. परंतु आपली कामे थांबणार नाहीत," असे खासदार विखे म्हणाले.

विखे म्हणाले, "गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत भाजप व महायुतीचे सरकार आल्यानंतर साखळाई योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली व सर्वेक्षण सुरू करण्यात आले. सर्वेक्षण झाल्यानंतर काही दिवसांतच हे काम पूर्ण होईल. साखळाई पाणी योजनेवर केवळ राजकारण झाले. साखळाई योजनेचे काम इतर कोणाला जमले नाही ते आपण कागदावर आणून सुरू केले."

Sujay Vikhe
Ajit Pawar: अजितदादांच्या 'पीएच.डी.'वर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर बार्शीत गुन्हा दाखल

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ७९४ कोटी रुपयांची योजना तीन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिल्या टप्प्यात ४०० कोटींची कामे होतील. गेली ५० वर्षे योजनेसाठी फक्त आश्वासन दिली जायची. ती प्रत्यक्षात आपण सुरू केल्याचे खासदार विखे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे पूर्णत्वास आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील विकासकामाला गती आणि कुठेही तडजोड केली जात नाही. परंतु ही विकासकामे विरोधकांना सहन होण्यासारखी नाहीत. त्यामुळे ते आपल्याला विरोध करत आहेत. परंतु आपली कामे थांबणार नाहीत, असेही खासदार विखे म्हणाले.

कोरेगाव येथील बंधाऱ्यांचे, वडगाव ते कडकडे मळा रस्त्याचे, गुंडेगाव ते इंगळे मळा रस्त्याचे, खडकाई मळा येथे रोहित्राच्या कामाचे भूमिपूजन झाले. या वेळी जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, दीपक कारले, भाऊसाहेब बोठे, रभाजी सुळ, मधुकर मगर, संजय गिरवले हे विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

Sujay Vikhe
Prajakt Tanpure: सरकारी डेपो वाळू विक्रीत अनेक त्रुटी; आमदार तनपुरे आक्रमक, अचानक भेट देत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com