Pathri Market Committee, News Sarkarnama
मराठवाडा

Pathri Market Committee : पाथरीत ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादीत जुंपली..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : पाथरी बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) ( ठाकरे गट ) अद्याप कोणालाही आपला पाठिबा दिला नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खोटा प्रचार केला जात असल्याचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे व उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाथरी बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या आदेशानुसार काही उमेदवारी अर्ज दाखल केले होते, शेवटपर्यंत खासदार जाधव यांनी महाविकास आघाडीचा (Shivsena) धर्म पाळण्यासाठी प्रयत्नही केले परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अनुकूल असा प्रतिसाद दिला नाही.

शेवटच्या टप्प्यात खासदारांच्या आदेशानुसारच आम्ही सर्व उमेदवारी अर्ज परत घेतले, यानंतर आम्ही आमची भूमिका मांडण्या आधीच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला (Ncp) पाठिंबा दिल्याचा प्रचार सुरू केला आहे. तालुक्यात ग्रामपंचायत व सोसायटी मतदार संघात चांगले मतदान असल्याने ते आपल्या पारड्यात पडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा डाव आहे.

दरम्यान खासदार संजय जाधव हे कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा तटस्थ रहायचे या बाबतचा निर्णय घेणार आहेत, असे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे व उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी युवासेनेचे रामचंद्र आम्ले, सिद्धेशवर इंगळे, तुकाराम हारकळ, कृष्णा शिंदे, भारत धनले,आसाराम व्हराडे यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT