Marathwada News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे वाढते वय आणि त्यातही कायम असलेला सळसळता उत्साह हा नेहमीच राजकारणात चर्चेचा विषय राहिला आहे. (Sharad Pawar On Age) वयाबद्दल कुणी विचारलेलं पवारांना बहुदा फारसं आवडतं नाही. पण यावर ते न रागवता समोरच्याला गप्पगार करतात. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत याचा अनुभव येथील पत्रकारांना आला.
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार संपुर्ण राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. नव्याने पक्ष बांधण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. निम्मी राष्ट्रवादी फुटली असली तरी (Sharad Pawar) शरद पवार हार मानायला तयार नाहीत. वाढत्या वयात पुन्हा तुम्ही पक्षाची बांधणी कशी करणार? असा प्रश्न पत्रकाराने विचारला. (Aurangabad) त्यावर ` माझे वय काढता, कुस्ती खेळता का माझ्याशी`, अशी मिश्किल टिपणी पवारांनी केली आणि उपस्थित इतर पत्रकारांनी देखील त्याला दाद दिली.
१९८० साली आपल्या पक्षाचे ५४ आमदार सोडून गेले, त्यानंतर आपण पुन्हा पुढच्या निवडणुकीत त्यापेक्षा जास्त आमदार कसे निवडून आणले याचा संदर्भ शरद पवार पत्रकारांना देत होते. (NCP) पण तेव्हा केलेली किमया तुम्हाला या वयात शक्य होईल का? या पत्रकारांच्या प्रश्नावर पवारांनी जो काय षटकार ठोकला, की आता पुन्हा त्यांच्या वयाबद्दल विचारण्याची हिमंत कुणी करणार नाही.
शरद पवार हे देशाच्या राजकारणातील एक आदर्श नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आपल्या मनाचा ठाव कुणालाही लागू न देणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. आपल्या आश्चर्यकारक भूमिकांमुळे त्यांनी अनेकदा विरोधकांची दांडी उडवली आहे. आजारपण, शस्त्रक्रिया या संकटातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकारणातील वाटचाल मंदावण्याऐवजी सुसाट वेगाने सुरू आहे.
शरद पवारांचे वय झाले आहे, त्यांनी आता थाबांव, असा पुतणे अजित पवारांनी दिलेला सल्ला देखील त्यांनी झुगारला. पक्ष फुटल्याचे दुःख करत बसण्यापेक्षा पुन्हा मैदानात उतरून लढण्याची धमक त्यांनी दाखवली. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांच्यातील हा आत्मविश्वास तरुणांना लाजवणारा ठरत आहे. लढण्याच्या इराद्याने बाहेर पडलेल्या पवारांची येवला येथे पहिली सभा झाली होती. त्यानंतर दुसरी सभा मराठवाड्यातील बीडमध्ये उद्या होत आहे. त्यामुळे पवार आणि वाढते वय याचा संबंधच नाही हेच जणू त्यांनी आजच्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.