जालना ः दोन वर्षापूर्वी शरद पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली आणि आजच्या दिवशीच ईडीला आव्हान देत, मीच येतो असा इशारा पवारसाहेबांनी दिला होता. राज्य व देशभरातील वातावरण या घटनेने ढवळून निघाले होते. या देशात सूडाचं राजकारण सुरू आहे, याचाच तो भाग होता. पवारसाहेबांचा त्या प्रकरणाशी संबंध नव्हता, तरी जाणीवपूर्वक बदनामी करायची हे कुटील कारस्थान होते.
दिल्लीच्या तख्ताने पवारसाहेबांना नमवण्याचा प्रयत्न केला, परंतु दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले, याची आठवण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून दिली. परिवास संवाद यात्रेच्या निमित्ताने घनसांवगी ते बोलत होते. ही घटना लोकांच्या मनावर खोलवर बसली आणी आज आपण महाराष्ट्राच्या सत्तेत आहोत, असेही ते म्हणाले.
पवारसाहेबांच्या किमयेने व दूरदृष्टीने राज्यात सरकार स्थापन झाले आणि त्यात राजेश टोपे यांना आरोग्य मंत्री म्हणून स्थान मिळाले. देशात आरोग्याचे चांगले काम न केल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना काढून टाकण्यात आले, परंतु महाराष्ट्राचा हा आरोग्यमंत्री जगात कामाने मोठा झाला. मूर्ती लहान पण किर्ती महान, असे राजेश टोपे यांचे काम आहे, असे गौरवोद्गारही जयंत पाटील यांनी काढले.
जयंत पाटील म्हणाले, सरकार आल्यावर संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कामांना प्राधान्य देता येते. दिवस हे बदलत असतात, आज आपली सत्ता आली आहे. या नेत्यामुळे तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यांच्या पाठीशी उभे रहा. पक्षाची मरगळ झटकून टाकावी या उद्देशाने ही परिवार संवाद यात्रा काढली आहे.
पायाला भिंगरी लावून २८८ मतदारसंघात जयंत पाटील जात आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. गल्हाटी धरणग्रस्तांना आपल्या माध्यमातून दिलासा मिळावा. घनसावंगीच्या पदाधिकार्यांनी शंभर टक्के बुथ कमिट्या तयार केल्या आहेत. संघटना बाबी लक्षात घेऊन काम करण्याची गरज आहे.
आजपासून आमदार कार्यालयातून यापुढे काम होणार नाही तर ते बुथ कमिट्यांच्या माध्यमातून होतील, असा शब्दही टोपे यांनी या निमित्ताने प्रदेशाध्यक्षांना दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैकीच्या पैकी जागा निवडून आणल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.