Phulambri Market Committee News
Phulambri Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Phulambri Market Committee : मजबुत पॅनलसाठी राजकीय पक्षांची पसंती कोट्याधीश उमेदवारांनाच..

नवनाथ इधाटे

Marathwada Politics : बाजार समिती निवडणुकीत (Market Committee) माघार घेण्यासाठी छत्तीस तांसापेक्षा कमी अवधी उरला आहे. त्यामुळे आपलेच पॅनल मजबुत असले पाहिजे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आर्थिक सक्षम म्हणजेच कोट्याधीस उमेवारांनाच सर्वाधिक पसंती दर्शवल्याचे चित्र आहे. पॅनलमधला उमेदवार हा सर्वच बाजूंनी सक्षम असावा यासाठी स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवाराची चाचपणी अंतिम टप्प्यात असून राजकीय पक्षाकडून कोट्याधीश उमेदवारांना पसंती दिली जाऊ लागल्याचे बोलले जाते.

सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्याकडून आर्थिक बाजूने सक्षम असणाऱ्या उमेदवाराबाबत सकारात्मक विचार केला जाऊ लागला आहे. (Bjp) त्यामुळे या निवडणुकीत कोट्यावधीची उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १८ जागांसाठी तब्बल १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. (Mahavikas Aghadi) नऊ जणांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणाने बाद करण्यात आले होते. त्यामुळे सध्या १३९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

पैकी पाच उमेदवारांनी आतापर्यंत माघार घेतली आहे, तर २० एप्रिलपर्यंत आणखी कितीजण माघार घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Haribhau Bagde) विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून अपक्ष व इतर उमेदवारांचा विचार केला जाऊ लागला आहे. ज्या उमेदवाराचे उपद्रव मुल्य पक्षासाठी नुकसान देणारे ठरू शकेल अशांची मनधरणी करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. युती-आघाडीचे प्रयत्न सुरू असून अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.

त्यामुळे इच्छूकांनी थेट मतदारांच्या भेटी घेत कानोसा घेण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे आपले पॅनल मजबूत असले पाहिजे या उद्देशाने राजकीय पक्षांचे नेते आर्थिक सक्षम उमेदवारांना प्राधान्य देत आहेत. या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून ११, ग्रामपंचायत मतदार संघातून चार, व्यापारी मतदारसंघातून दोन, तर हमाल व तोलारी मतदारसंघातून एक अशा १८ जागांसाठी मतदान होणार आहे.

काँग्रेस, भाजप व शिवसेना शिंदे गट हे आर्थिक बाजूने सक्षम उमेदवारांना प्राधान्य देऊ लागल्याने या निवडणुकीत कोट्यावधीची उलाढाल होण्याची शक्यता आहे. भाजपकडून आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहे. शिवसेना- शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी स्वतंत्र पॅनलची तयारी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT