Abdul Sattar News : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रशासकीय इमारतीचे भुमिपूजन, तीन मंत्र्यांसाठी हेलिपॅडची तयारी...

Sillod-Soygaon : साडेआठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून २० हजार स्क्वेअर फूट जागेवर इमारत उभारण्यात येणार आहे.
Abdul Sattar News
Abdul Sattar NewsSarkarnama

Marathwada : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सोयगांव येथे उभारण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीचे भुमीपूजन येत्या २२ एप्रिलला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोहयो तथा पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) व स्वतः कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थीत राहणार आहेत. या मंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरसाठी सोयगाव येथे हेलिपॅड देखील उभारण्यात येत आहे.

Abdul Sattar News
Ambadas Danve allegations on commissioner : पोलिस आयुक्तांच्या आशिर्वादाने हप्तेखोरी, अवैध धंदे सुरू..

गेल्या कित्येक वर्षापासून भाड्याच्या जागेतून सोयगांव तालुक्याचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. प्रशासनाच्या मालकीची स्वतःची भव्य अशी इमारत असावी यासाठी (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी सरकारकडे मागणी केली होती. अखेर सोयगांव येथील तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीला मंजुरी आणि निधी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे.

प्रशासकीय इमारतीचे भुमिपूजन करण्यासाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त निवडण्यात आला असून २२ एप्रिल रोजी सोयगांव येथे दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. (Radhakrishna Vikhe Patil) राज्याचे तीन मंत्री या सोहळ्या हजेरी लावणार असल्याने प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. (Marathwada) या इमारतीसाठी साडेआठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून २० हजार स्क्वेअर फूट जागेवर इमारत उभारण्यात येणार आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन होत आहे. या सोहळ्याची पुर्वतयारी आणि हेलिपॅडच्या जागेची पाहणी मंगळवारी प्रशासनाकडून करण्यात आली. या तालुका स्तरीय प्रशासकीय इमारतीसाठी सार्वजनिक विभागाची जागा तहसील कार्यालयाला हस्तांतरित करण्यात आली आहे. वीस हजार स्केअर फूट जागेत तहसील कार्यालयाची इमारत व उर्वरित शासकीय कार्यालये स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

नव्या इमारतीचे भुमीपूजन होत असल्याने भाडोत्री कार्यालयात सुरू असलेल्या सध्याच्या शासकीय कार्यालयाचे भाग्य उजळल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. मंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी मंगळवारी तहसीलदार रमेश जसवंत, सार्वजनिक विभागाचे उपअभियंता अजय टाकसाळ, नितीन राठोड, पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी पाहणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com