Ashok Chavan On Eknath Shinde MLAs : Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan On Cabinet Expansion : अजितदादांकडे बोट दाखवून अशोक चव्हाणांनी शिंदेंच्या आमदारांना चुचकारले !

Ashok Chavan On Eknath Shinde MLAs : राजकारण IPL सारखं झालं आहे.. शिंदेच्या आमदारांनी परत यायला हरकत नाही.

Chetan Zadpe

Nanded News : नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच अर्थखातं मिळाल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या आमदारांवर टीका केली जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अजित पवारांकडे गेलेल्या अर्थखात्यामुळे या मुद्द्यावर बोट ठेवत शिंदेंच्या आमदारांना चुचकारले आहे. “अजित पवार (Ajit Pawar) यांना अखेर अर्थखातं मिळालं आहे, त्यामुळे तिकडे गेलेल्या आमदारांनी परत यायला हरकत नाही,” असा टोला चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “अजित पवार (Ajit Pawar) यांना अखेर अर्थखातं मिळालं आहे, त्यामुळे तिकडे गेलेल्या आमदारांनी परत यायला हरकत नाही, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून आम्हाला अर्थमंत्री अजितदादाकडे न्याय मिळत नाही आहे, असे म्हणत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सोडून आमदार दुसऱ्यांसोबत गेले होते.” चव्हाण ते आज नांदेड मध्ये बोलत होते.

राजकारण IPL सारखं झालं :

“आताचं राजकारण हे IPL सारखं झालं आहे. यामध्ये आपण कुठं बसतो? असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. मीडियाशी संवाध साधताना आपण खूप सावधपणे बोलतो. आताच्या राजकारणाचा स्तर घसरत चाललेला आहे. आयपीएल सारखे बोली सुरू आहे. पक्षांतर, अपात्रतेचा मुद्दा आहे परंतु या कायद्यांचीच पायमल्ली केली जात आहे,” अशी भावना चव्हाणांनी बोलून दाखवली. (Pointing at Ajit pawar, Ashok Chavan taunted cm Eknath Shinde's MLAs)

न्यायालयात तारीख पे तारीख :

न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे. न्यायाला विलंब होत आहे. राजकारणाची दिशा नेमकी कुठे जाणार आहे, कोण कुठल्या पक्षात जातो, कोण कुठल्या गटात राहतो, हाच मोठा कार्यक्रम झाला आहे, असा संतापही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मिळालेल्या खातेवाटपाची यादी -

अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन

संजय बनसोडे - क्रीडा

आदिती तटकरे - महिला बालविकास मंत्रालय

हसन मुश्रीफ - वैदकीय शिक्षण

अनिल पाटील - मदत पुनर्वसन

दिलीप वळसे पाटील - सहकार

धनजंय मुंडे - कृषी खाते

छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा

धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध पुरवठा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT