Shivsena Politics : विकासकामांची मंजुरी तसेच निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री दादा भुसे यांच्या सुचेननुसार झालेला आहे. त्याबाबत अनेक आमदारांत नाराजी आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उमटले. मात्र पालकमंत्र्यांऐवजी या आमदारांनी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांवनाच लक्ष्य केल्याने अस्वस्थता आहे. (Eknath Shinde Group`s MLA politicaly disturbed in Nashik on Funds allocation)
नाशिक (Nashik) जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न काही आमदारांनी केला. त्यात आमदार सुहास कांदे (Suhas Kande) आघाडीवर असल्याचे दिसते. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या आमदारांत अस्वस्थता असल्याचे चित्र आहे.
नांदगाव मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यातील ४८ गावे येतात. या गावांना भौगोलिक क्षेत्रानुसार १२ कोटींचा नियत्वे देय असतानाही या अंतर्गत जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप करत आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अर्जुन गुंडे यांच्यावर प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली.
माझ्या या गावांना कुणाच्या सांगण्यावरून निधी देत नाहीत, का देत नाही, मला शिपाई खैरनार यांच्यामार्फत निधी देणार नाही, असे निरोप धाडतात, असे सांगत गुंडे यांच्या मालमत्तेची सक्त वसुली संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी केली.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात मालेगाव तालुक्यातील १५२ गावांपैकी ४८ गावे येतात. या गावांसाठी जिल्हा परिषदेच्या इवंद-२ अंतर्गत ३०५४ आणि ५०५४ या दोन हेड अंतर्गत रस्त्यांची कामे करता येतात. त्यानुसार २०२२ मध्ये या मतदारसंघात १२ कोटींची नियत्वे असतानाही या गावांना एकही रुपयांचा निधी मिळाला नाही. भौगोलिक क्षेत्रानुसार या निधीचे वाटप करण्याचा २०१५ चा शासन निर्णयदेखील पाळला गेला नाही, असा आमदार कांदे यांचा आरोप होता.
कोण आहेत गुंडे?
गुंडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असून, बांधकाम, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी असताना जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाच्या कामात त्यांचा हस्तक्षेप असतो. ठेकेदार त्यांच्याच संपर्कात असतात इतकेच नव्हे, तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क केला तरी गुंडे हेच विषय हाताळतात, त्यामुळे गुंडे जिल्हा परिषद चालवतात का? ते कुणाच्या सांगण्यावरून निधी देत नाही, याची विचारणा करीत नाशिक जिल्हा परिषदेच्या ठेकेदार सांभाळण्याच्या कामकाज पद्धतीवर त्यांनी संशय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.