Walmik Karad Santosh Deshmukh Murder sarkarama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder : महेश केदारच्या 'फोनमुळे' सगळेच अडकले; पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांना मारहाण करतेवेळीचा व्हिडीओ देखील पोलिसांसाठी महत्वाचा पुरावा ठरला. हाच पुरावा महेश केदारच्या फोनमधून हाती लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Hrishikesh Nalagune

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. 80 दिवसांच्या आत आरोप पत्र दाखल करण्याची कामगिरी पोलिसांनी बजावली आहे. या आरोपत्रातून संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. तर यात वाल्मीक कराडचा उल्लेख आरोपी क्रमांक एक म्हणून करण्यात आला आहे. त्याच्याच इशाऱ्यानुसार देशमुखांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनी ही चार्जशीट दाखल करताना वेगवेगळ्या 66 पुराव्यांचा आधार घेतला आहे. याशिवाय तब्बल 184 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यात पाच गोपनीय साक्षीदारांची साक्षही महत्वाची ठरली. संतोष देशमुख यांना मारहाण करतेवेळीचा व्हिडीओ देखील पोलिसांसाठी महत्वाचा पुरावा ठरला. हाच पुरावा महेश केदारच्या फोनमधून हाती लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना आरोपींनी तब्बल तीन तास अमानुष मारहाण केली. ही मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडीओ आणि आठ फोटो काढले. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ सीआयडीने महेश केदारच्या फोनमधून जप्त केले आहेत. या व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपी हे संतोष देशमुख यांना मारहाण करताना दिसून येत आहेत. याच मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला.

पाच गोपनीय साक्षीदारांची साक्ष ठरली टर्निंग पॉईंट :

या हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून अत्यंत महत्वाची माहिती समोर आली. यात आवादा कंपनीकडून खंडणी उकळताना संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा मेसेज वाल्मीक कराडने (Walmik Karad) विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता. आरोपी सुदर्शन घुले व विष्णू चाटे यांची नांदूर फाट्यावर भेट झाली होती.

या भेटीत पाच गोपनीय साक्षीदारांपैकी एक साक्षीदार सुदर्शन घुले सोबत होता. या भेटीत विष्णू चाटेने वाल्मीक कराडचा मेसेज सांगितला. संतोष देशमुख कामात आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा हा मेसेज होता असा दावा करण्यात येत आहे. याच पाच साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या आधारावर वाल्मीक कराडवर देशमुखांच्या खुनाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT