Sambhajinagar Dangal : Imtiyaz jaleel  Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगर दंगलीत पोलिसांची सहभाग? ; जलील यांनी लगावले गंभीर आरोप!

Chhatrapati Sambhajinagar News : जाळपोळ करणाऱ्यांना मोकळे का सोडले?

सरकारनामा ब्यूरो

Imtiaz Jaleel News : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar) किराडपुरा या भागात दोन गटात राडा घडून आला होता. यावरून राजकीय टीका टिपण्णी सुरू झाली होती. यावर आता खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लगावले आहेत. रामनवमीच्या आदल्या दिवशीच्या रात्री शहरातील किराडपुरा भागात या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या एकाचा मृत्यू झाला होता. यावरूनच जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलिसांच्या भूमिकेवरून, संबंधित ठिकाणच्या हिंसाचारावरून त्यांच्या गैरहजेरीबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचं, जलील यांचे म्हणणे आहे. तर या संपूर्ण घटनेची निवृ्त्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं घ्यावे, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना लिहले आहे.

पोलीस कुठे गेले होते?

इम्तियाज जलील यांनी पत्रात म्हंटले आहे की, "ज्या ठिकाणी हा सर्व वाद घडून आला, त्याच ठिकाणी मी स्वतः मंदीरात दोन तासांहून जास्त वेळ होतो. मात्र या ठिकाणी केवळ 15 पोलीसच यावेळी दिसत होते. या पोलिसांना फक्त मंदीराच्या ठिकाणची जबाबदारीच नाही, तर दगडफेक करणाऱ्या, जाळपोळ करणाऱ्याॉ लोकांना आवरण्याचे काम दिले गेले होते.

तर या राड्यामध्ये एकूण 13 वाहने जाळली गेली असून, यापैकी वाहनांपैकी मोठ-मोठ्या पोलीस व्हॅन वाहन होत्या. त्यामुळे जाळपोळ करणाऱ्या लोकांना मोकळे का सोडले? 13 पोलिसांचे वाहन जाळले गेले, त्यावेळी पोलीस कुठे होते. असे प्रश्न जलील यांनी उपस्थित केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT