Karnataka Assembly Election : ‘शिवकुमारांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली’: दुसरी यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उफाळली बंडखोरी

काही विभागांमध्ये, सिद्धरामय्या यांनी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर वरचष्मा ठेवल्याचे दिसते.
D. k. Shivkumar
D. k. ShivkumarSarkarnama

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होताच अनेक भागात उफाळलेली बंडखोरी आणि असंतोष शांत करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे. उमेदवारी न मिळालेले इच्छुक बंडखोरीच्या तयारीत असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांची मनधरणी करण्याचे काम राज्यातील नेत्यांनी केले असले, तरी नाराजी, बंडखोरी काही कमी होण्याची लक्षणे नाहीत. (Disgruntled in Congress for not getting the nomination, in preparation for a mutiny)

या नेत्यांचे बंड शमवण्यासाठी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांनी वैयक्तिकरित्या रिंगणात येऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश अद्याप आलेले नाही. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत तिकिटाची अपेक्षा असलेल्या अनेक नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी आपल्या समर्थकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

D. k. Shivkumar
Solapur News : जत्रेतील ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी लावली चक्क बोली : साठी पार केलेल्या शेतकऱ्याने मारली बाजी!

नाराज नेत्यांनी निवडणूक लढविल्यास पक्षाच्या विजयाला खीळ बसू शकते, हे लक्षात घेऊन राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या तिकीटधारकांची मनधरणी करण्याचे काम सुरू केले आहे. यापुढे राज्यात पक्षाची सत्ता येईल. मग आम्ही तुम्हाला योग्य पद देऊ, असे सांगत बंडखोरीसाठी सज्ज असलेल्या अनेकांना आवाहन केले जात. तसेच, बंडखोरांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांनीही मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तरी बंडखोरांनी माघार घेतलेली दिसत नाही. उमेदवारी न मिळालेल्या काही इच्छुकांनी बंडाचे फलक लावले आहेत.

काही विभागांमध्ये, सिद्धरामय्या यांनी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर वरचष्मा ठेवल्याचे दिसते. कलघटगीचे तिकीट माजी मंत्री संतोष लाड यांना गेले. शिवकुमार यांचा नागराज छब्बी यांना पाठिंबा होता. तीर्थहळ्ळीमध्ये माजी मंत्री किमने रत्नाकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शिवकुमार यांचा पाठिंबा असलेले मंजुनाथ गौडा नाराज झाले आहेत.

D. k. Shivkumar
Samadhan Awatade News : आमदार समाधान आवताडेंनी राजकारण सोडण्याचा दिला इशारा; मंगळवेढ्यातील बैठकीत नेमके काय झाले?

चित्रदुर्गाचे तिकीट नाकारल्यानंतर माजी आमदार रघु आचार यांनी शिवकुमार यांना फटकारले. ‘तिकीट मिळण्याच्या आशेने पक्ष मजबूत करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. मी उच्च जातीचा नाही; म्हणून मला निराश केले गेले. त्यांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली आहे,’ असा आरोप माजी आमदार आचार यांनी केला. आपण निवडणूक लढवणार असल्याचा त्यांनी निर्धार बोलून दाखविला आहे. राज्यभरातील विश्वकर्मा समाजाला काँग्रेसच्या विरोधात एकत्र करणार असल्याचे आचर यांनी सांगितले.

धारवाडमध्ये तिकीटाचे दावेदार इस्माईल तमटगर हे विनय कुलकर्णी यांच्या निवडीवर नाराज आहेत. इस्माईल यांनी सांगितले की, मी धारवाडमधून निवडणूक लढवणार आहे, येथे 53 हजार मुस्लिम मते आहेत. त्यांना धजद आणि एआयएमएमची ऑफर आहे. कलघटगीचे तिकीट न मिळाल्याने नाराज छब्बी बंड करण्याच्या तयारीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

D. k. Shivkumar
Congress News : मल्लिकार्जून खर्गेंचा पराभव घडविण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नेत्यालाच काँग्रेसने दिले तिकिट!

मोलकलमुरू येथे पक्षाचे कार्यकर्ते गोपालकृष्ण यांना तिकीट मिळण्याच्या विरोधात होते. काँग्रेसने आतापर्यंत १६५ उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु, पुलकेशीनगर, हरिहर, कुंदगोळ, सिडलघट्ट आणि लिंगसुगुर या पाच मतदारसंघात तिकीट जाहीर केलेले नाही, जेथे त्यांचे विद्यमान आमदार प्रतिक्षेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com