Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Beed News : भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ बॅंकेला नोटीस

आर्थिक गैरव्यवहारामुळे हा कारखाना यापूर्वीही चर्चेत होता.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी बॅंकेला बीड (Beed) पोलिसांच्या (Police) आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस (Notice) बजावली आहे. एका कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. सत्ताधारी भाजप नेत्या असलेल्या मुंडे यांच्या बॅंकेला नोटीस आल्याने बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Police notice to Vaidyanath Bank of Beed)

दरम्यान, याच वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षाला लाच घेताना पकडण्यात आले होते. तसेच, आर्थिक गैरव्यवहारामुळे हा कारखाना यापूर्वीही चर्चेत होता. आता पुन्हा एका काखान्याच्या विक्रीतील गैरव्यवहारामुळेच बॅंकेला आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या कारखान्यावर खासदार डॉ. प्रीतम मुंडे या संचालक आहेत.

वैद्यनाथ बॅंकेकडे उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील शंभूमहादेव हा साखर कारखाना गहाण ठेवण्यात आलेला होता. शंभूमहादेव कारखान्याकडून कर्जाची रक्कमेची मुदतीत परतफेड झाली नाही, त्यामुळे बॅंकेने हा कारखाना लिलावात काढला होता. या लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याची तक्रार बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारे बीड पोलिसांनी बॅंकेला नोटीस पाठवली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ता. २४ जानेवारी रोजी बॅंकेला ही नोटीस दिली आहे. येत्या ३१ जानेवारी रोजी कागदपत्रांसह हजर राहून खुलासा करण्यात यावा, असे या नोटिशीद्वारे बॅंक अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या या कारखान्याला बीड पोलिसांकडून नोटीस आल्याने बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंडे भगिनी नेमक्या कुणाच्या निशाण्यावर आहेत, अशी चर्चा बीडमध्ये पुन्हा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT