Thackeray At Thane : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सावली बनले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड!

या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शेवटपर्यंत आपल्यासोबत घेतले होते.
Thackeray At Thane : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सावली बनले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड!
Published on
Updated on

ठाणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना (Shivsenaउद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रथमच आज (ता. २६ जानेवारी) ठाण्यात (Thane) आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे होमपिच आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या ठाण्याच्या या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना शेवटपर्यंत आपल्यासोबत घेतले होते. या दौऱ्यात आव्हाड हे ठाकरे यांची सावली म्हणूनच वावरल्याचे दिसून आले. (Uddhav Thackeray took NCP's Jitendra Awhad with him during his visit to Thane)

Thackeray At Thane : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सावली बनले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड!
Nagar Congress Committee : नाना पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना दे धक्का : नगरची अख्खी जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त

जैन धर्मियांच्या महोत्सवाला आणि मंदिराला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात हजेरी लावली. ठाकरे यांचा हा ठाणे दौरा अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरला आहे. कारण, ठाण्यात आलेल्या ठाकरे यांच्या स्वागतलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. ठाकरे यांनी तेथूनच आव्हाड यांना सोबत घेतले. ठाण्यातील टेंभी नाका हे शिवसेनेचे महत्वाचे स्थान मानले जाते. कारण याच ठिकाणी आनंद दिघे यांचा पुतळा आहे. दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करतानाही ठाकरे हे आव्हाड यांना सोबत घेऊनच गेले. वास्तविक ठाण्याचे खासदार राजन विचारे सोबत असतानासुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हेच होते. चालतानाही ते आव्हाड यांच्याशीच संवाद साधत होते.

Uddhav Thackeray-Jitendra Awhad
Uddhav Thackeray-Jitendra AwhadSarkarnama
Thackeray At Thane : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सावली बनले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड!
Congress News : सत्यजित तांबेंना पाठिंबा देणे पडले महागात : काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद गमावावे लागले

आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जैन धर्मियांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असतानाही ठाकरे यांनी आव्हाड यांना आपल्याचा गाडीत बसवले, ते अगदी आपल्या शेजारच्या सीटवरच. त्यावेळी खासदार विचारे हे पुढच्या सीटवर म्हणजेच ड्रायव्हरशेजारी बसले हेाते. मात्र, ठाकरे यांच्याशेजारी आव्हाडच होते. जैन धर्मियांच्या कार्यक्रमाच्या स्टेजवरही ठाकरे यांच्या बाजूला आव्हाडच होते. एकंदरीतच दौऱ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत जितेंद्र आव्हाड हे ठाकरेंसोबत कायम होते.

Uddhav Thackeray-Jitendra Awhad
Uddhav Thackeray-Jitendra AwhadSarkarnama

जैन मंदिरात हजेरी लावून उद्धव ठाकरे यांनी जैन धर्मियांसमोर छोटेखानी भाषण केले. या मंदिरात या अगोदरही आपण आला होतो. तसेच, बाळासाहेब ठाकरेही या मंदिरात आले होते. त्यांनी या ठिकाणी आरती केली होती, अशा आठवणीही जागवल्या.

Thackeray-Awhad
Thackeray-Awhad
Thackeray At Thane : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सावली बनले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड!
Daund Mass Murder Case : बदल्याच्या भावनेने सुडाने पेटलेल्या पाच भावंडांनी चुलत भावासह सात जणांना संपवले

तत्पूर्वी शिवाजी मैदानावर आरोग्य शिबिरालाही उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या स्टेजवर ठाकरे-आव्हाड यांच्यात हास्यविनोद रंगला होता. काही धीरगंभीर विचारही सुरू असल्याचे त्यांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे जाणवले. याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आपण लवकरच भाषण करण्यासाठी ठाण्यात येणार आहे. आता मी नागरिकांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी आलो आहे, पुढच्या वेळी ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी करण्यासाठी येणार आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com