Aurangabad : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या काल सायंकाळी झालेल्या वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील शिवसंवाद मेळाव्या दरम्यान दगडफेक झाल्याचा आरोप (Aditya Thackeray) ठाकरे गटाकडून केला जातोय. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून चौकशीची मागणी देखील केली आहे.
वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनीच दगडफेक करायला लावली असा आरोप देखील खैरे-दानवे यांच्याकडून केला जातोय. (Shivsena) या सगळ्या प्रकारावर पोलिसांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. (Aurangabad) महालगाव येथील आदित्य ठाकरे यांच्या सभेदरम्यान, गोंधळ झाला, परंतु ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली नसल्याचा दावा ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांनी केला आहे.
गोंधळानंतरही आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली, तेही सुखरूप परतले असे सागंत त्यांनी दगडफेकीसारखा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. सभेला जात असताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे लांजेवार यांनी मान्य केले. या गोंधळात एक कॅमेरामन किरकोळ जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नाही. आदित्य ठाकरे यांच्या कारवर मात्र कोणत्याही प्रकारची दगडफेक झालेली नाही. तसे झाले असते तर मोठा गोंधळ झाला असता. पण तसे न होता ठाकरे यांची सभा सुरळीतपणे पार पडली आणि त्यानंतर ते सुखरूप परतलेही. त्यामुळे पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला या आरोपात तथ्य नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.