Aurangabad : वैजापूर तालुक्यातील महालगांव येथील शिवसंवाद मेळाव्यासाठी आलेल्या युवासेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर काल दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे ठाकरे गट संतप्त झाला आहे, तर दुसरीकडे यामागे शिंदे गटाचे वैजापुरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (Mla Ramesh Bornare) यांचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
यावरून राजकारण तापले असले तरी बोरनारे यांचे नाव या घटनेमागे येण्याचे एक कारण आता समोर येत आहे. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी याच महालगावांत आमदार बोरनारे यांना (Aditya Thackeray) ठाकरे समर्थकांनी जोरदार विरोध दर्शवत गावात येण्यास मज्जाव केला होता. (Shivsena) एका भांडे दुकानाच्या उद्घाटनासाठी बोरनारे महालगावात आले असतांना ठाकरे आणि बोरनारे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते.
पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणा आणि काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांनी बोरनारे यांना गावातून निघून जाण्यास भाग पाडले होते. एवढेच नाही, तर निषेधासाठी सोबत आणलेल्या काळ्या झेंड्याच्या काड्या देखील बोरनारे यांच्या गाडीवर मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे तिथे तणाव निर्माण होवून दोघांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत बोरनारे यांना गावातून सुखरूप बाहेर काढले होते.
यावेळी संतपालेल्या बोरनारे यांनी देखील ठाकरे समर्थकांना शिवीगाळ केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट झाले होते. नेमकं त्याच महालगांवत काल ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाल्याने यामागे बोरनारेंचा तर हात नाही ना? अशी शंका उपस्थीत केली जात आहे. बोरनारे यांनी मात्र खैरे-दानवेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
मी इतक्या खालच्या पातळीवर जाणारा माणूस नाही, जे करायचे ते समोर येवून करेन. खैरे-दानवे यांनी वैजापूर तालुक्यासाठी काहीच केले नाही, ते अपयश लपवण्यासाठी त्यांनी या प्रकरणात माझे नाव गोवले असल्याचा आरोप देखील बोरनारे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.